महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत साकारली दहा फूट उंचीची संभाजी महाराजांची मूर्ती - शिवजयंती

बारा तासात साकारली छत्रपती सभाजी राजाची मूर्ती. कोल्हापुरातील मूर्तिकार किशोर सुतार आणि पीयूष सुतार यांनी साकरली ही मूर्ती.

सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत साकारली दहा फूट उंचीची संभाजी महाराजांची मूर्ती ; मावळा ग्रुपचा उपक्रम

By

Published : Feb 19, 2019, 1:17 PM IST

कोल्हापूर -छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती वर्षांतून तीन वेळा साजरी केली जाते. ही प्रथा बंद करून शिवजयंती फक्त १९ फेब्रुवारीलाच साजरी करावी या उद्देशाने कोल्हापूरातील मावळा कोल्हापूर या ग्रुपच्यावतीने विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाही अशाच पध्द्तीचा उपक्रम राबविण्यात आला. कोल्हापूरातील मूर्तिकार किशोर सुतार आणि पीयूष सुतार यांनी अवघ्या बारा तासात संभाजीराजे यांची मूर्ती साकारली.

सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत साकारली दहा फूट उंचीची संभाजी महाराजांची मूर्ती ; मावळा ग्रुपचा उपक्रम

सकाळी सुर्योदय झाल्यानंतर या दोघांनी मूर्ती बनविण्याचा विडा उचलला आणि त्यांनतर बरोबर बारा तासांनी म्हणजेच वेळी संपूर्ण मूर्ती आकाराला आली.

सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत साकारली दहा फूट उंचीची संभाजी महाराजांची मूर्ती ; मावळा ग्रुपचा उपक्रम
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने कोल्हापुरातील मावळा ग्रुपच्यावतीने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ग्रुपच्यावतीने मिरजकर तिकटी येथे आज शिवजयंती उत्साहाला सुरवात झाली. या उपक्रमात सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत छत्रपती शंभूराजे यांच्या अर्धकृती पुतळा उभा करण्याचा मानस होता.
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत साकारली दहा फूट उंचीची संभाजी महाराजांची मूर्ती ; मावळा ग्रुपचा उपक्रम

ABOUT THE AUTHOR

...view details