महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

व्हिडिओ : कोल्हापूरची 'चेरापुंजी' गगनबावड्यात वरुणराजा दाखल, पहिला पाऊस अनुभवण्यासाठी पर्यटक घाटमाथ्यावर - KOLHAPUR

गगनबावड्यात इतका पाऊस पडतो की, येथे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी गावकऱ्यांना सरकारकडे करावी लागते. अर्थात कोल्हापूरचे चेरापुंजी म्हणून या गगनबावड्याची ओळख आहे. हा सर्व आनंद लुटण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक कोल्हापूरला येत असतात. परंतु या वर्षीची परिस्थिती काही वेगळी आहे.

गगनबावड्यात वरुणराजा दाखल

By

Published : Jun 14, 2019, 11:18 AM IST

Updated : Jun 14, 2019, 12:31 PM IST

कोल्हापूर- अरबी समुद्रातील वायू वादळाच्या आक्रमणानंतर आता जिल्ह्यात पाऊस येऊन धडकला आहे. कोकण किनारपट्टीलगत आणि जिल्ह्याची वेस असणाऱ्या गगनबावड्याच्या घाटमाथ्यावर पावसाला सुरुवात झाली आहे. गगनबावडा परिसरातील पहिल्या पावसाची आणि ढगात हरवलेल्या घाटमाथ्याची दृश्ये खास 'ई टीव्ही भारत'च्या प्रेक्षकांसाठी...

कोल्हापुरची 'चेरापुंजी' गगनबावड्यात वरुणराजा दाखल; पहिला पाऊस अनुभवण्यासाठी पर्यटक घाटमाथ्यावर

कोल्हापूर हा निसर्ग सौंदर्याने बहरलेला जिल्हा आहे. याच कोल्हापूरच्या पश्चिमेला विशाल अशा सह्याद्रीच्या डोंगररांगा आहेत. या डोंगररांगांच्या कुशीत वसलेले आणि कोकणालगत कोल्हापूर जिल्ह्याची वेस असलेले गाव म्हणजे गगनबावडा. गगनबावडा म्हटलं तर येथील डोंगराच्या टोकावरती असणारे गगनगिरी महाराजांचे मंदिर सर्वांना परिचित आहे. गगनगडाच्या डोंगररांगा या समुद्रसपाटीपासून जवळपास ७ ते ८ हजार फुटांवरती आहेत. याच गगनबावड्यात दरवर्षी तुफान असा पाऊस अनुभवायला पर्यटक गर्दी करत असतात.

गगनबावड्यात इतका पाऊस पडतो की, येथे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी गावकऱ्यांना सरकारकडे करावी लागते. अर्थात कोल्हापूरचे चेरापुंजी म्हणून या गगनबावड्याची ओळख आहे. हा सर्व आनंद लुटण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक कोल्हापूरला येत असतात. परंतु या वर्षीची परिस्थिती काही वेगळी आहे. जूनचा दुसरा आठवडा उलटला तरी पाऊस सध्या राज्यात दाखल झालेला दिसत नाही. परंतु, जिल्ह्यातील गगनबावडामध्ये असणाऱ्या डोंगररांगा कधी काळ्या तर कधी शुभ्र पांढऱ्या ढगांच्यामध्ये लुप्त होताना पाहायला मिळत आहेत.

काही क्षणातच ढग येतात तर काही क्षणातच दूर पळून जातात, अशी नयनरम्य दृश्ये पर्यटकांना येथे पाहायला मिळतात. तसेच या ठिकाणी पावसाचीदेखील सुरुवात झालेली आहे. कोकणातून हा पाऊस आता कोल्हापूरच्या दिशेने येऊ लागला आहे. या परिस्थितीचा आनंद घेण्यासाठी गगनबावड्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावरती दाखल झाले आहेत. त्याठिकाणी थांबून या सगळ्या पावसाचा, ढगांचा आणि दाट धुक्याचा आनंद घेत आहेत, तर काही पर्यटक आपल्या मोबाईलमध्ये ही दृश्ये कैद करण्याचा प्रयत्न करत आहेत. पहिल्या पावसातील घाटमाथ्यावरील ढगांची नयनरम्य दृश्ये खास 'ई टीव्ही भारत'च्या प्रेक्षकांसाठी...

Last Updated : Jun 14, 2019, 12:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details