महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Stop Widow Tradition : महाराष्ट्राचे पुरोगामी पाऊल, विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी शासन परिपत्रक - Widow Tradition

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद ( Stop Widow Tradition ) करण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे, असा शासन आदेश परिपत्रकाद्वारे जारी केला आहे.

छायाचित्र
छायाचित्र

By

Published : May 18, 2022, 10:13 PM IST

मुंबई/कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याची ( Stop Widow Tradition ) मागणी केली होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे, असा शासन आदेश परिपत्रकाद्वारे जारी केला आहे.

भारत देश विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून वाटचाल करत आहे. आजही पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातली जोडवी काढली जाणे, यासारख्या प्रथांचे पालन केले जात आहे. या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर आणि सरपंच सुरगोंडा पाटील आणि त्यांच्या ग्रामसभेने घेतला. प्रसारमाध्यमांनी या ठरावाचा सगळीकडे प्रसार केला. तसेच शासनाने विधवा प्रथा बंद व्हावी, यासाठी ग्रामपंचायतीनी काम करावे, असे आवाहन करणारी मागणी 17 मे, 2022 रोजी शासन परिपत्रक जारी केले आहे.

हेरवाड पॅटर्न राज्या राबवण्याचे आवाहन - अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव करणाऱ्या हेरवाड ग्रामपंचायतीचे सरपंच पाटील आणि ग्रामविकास अधिकारी कोळेकर यांनी घेतला. यासाठी विशेष परिश्रम घेतले. कोल्हापुरात आलेला महापूर आणि त्यानंतरच्या कोरोना काळात घरातील कमावती, कर्ती माणसे मरण पावली. विधवांचा मानसन्मान आणि समाजाचा बहिष्कार यावर उपाय म्हणून अशा प्रथा बंद करण्याचे धाडस ग्रामसभेने केले. कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जिल्हा आहे. याच कालावधीत राजर्षी छत्रपती शाहू स्मृती शताब्दी वर्ष साजरा करण्यात येत होता. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांनी विधवांसाठी केलेल्या कार्याची जाण म्हणून हा क्रांतिकारी निर्णयाचा ठराव केल्याचे सरपंच पाटील यांनी सांगितले. या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी महिला संघटनाही प्रयत्न करत होत्या. पण, एखादी प्रथा बंद करण्यासाठी कायद्याचा धाक आवश्यक होता. शासनाने आता हेरवाड ग्रामपंचायत पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविण्याचे आवाहन केले आहे.

सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार -विधवा महिलांना सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. विधवा प्रथांचे पालन होत असल्याने प्रतिष्ठेचे जीवन जगण्याच्या मानवी तसेच संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होते. त्यामुळे भविष्यात स्त्रियांच्या अधिकाराचे हनन होऊ नये, यासाठी ग्रामविकास विभाग पुढे सरसावला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी हेरवाडचे अनुकरण करून आदर्श ठेवण्याचे आवाहन केले आहे. या कूप्रथा बंद करण्यात महाराष्ट्र कायम आघाडीवर राहिला आहे.

हेही वाचा -Stop Widow Tradition : कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एका गावाने घेतला 'विधवा प्रथा बंदीचा निर्णय'

ABOUT THE AUTHOR

...view details