कोल्हापूर: सलग चौथ्यांदा त्यांनी कारखान्यावर विजय मिळवला आहे. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखालील शाहू आघाडीने शेवटपर्यंत झुंज दिली. नरके यांच्या विरोधात आमदार पी.एन. पाटील, आमदार विनय कोरे यांनी संपूर्ण ताकद लावली होती. शिवाय गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके तसेच चेतन नरके यांनी विरोधी आघाडीचा थेट प्रचार केला होता. त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र या अटीतटीच्या लढतीत चंद्रदीप नरके यांनी बाजी मारली आहे.
जस ठरले तसे केल्याचे मॅसेज व्हायरल: चंद्रदीप नरके यांना आमदार सतेज पाटील, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांची ताकद मिळाल्याने ही लढाई काही प्रमाणात नरके यांच्यासाठी सोपी बनली होती. जसे ठरले तसेच केले अशा आशयाचे मॅसेज तसेच फोटो मतदानाच्या दिवशी पासुन सोशल मीडियावर फिरत होते. यामुळे पुन्हा एकदा सतेज पाटील यांचा आमचं ठरलंय पॅटर्नची चर्चा झाली असून त्याची चर्चा सुरू आहे. गेली 18 वर्षे कारखान्यावर माजी आमदार चंद्रदीप नरके यांची सत्ता होती. परंतु यंदा च्या निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे यांनी ताकद लावल्याने निवडणुकीत चुरसनिर्माण झाली होती.
नरके गटाची ताकद वाढली:अशातच गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी उघडपणे विरोधी आघाडीस पाठिंबा दिला होता. तर त्यांचे पुत्र चेतन नरके थेट प्रचारात उतरत प्रचार सुरू केला होता. गोकुळच्या राजकारणात चंद्रदीप नरके यांनी सतेज पाटील यांना साथ दिली.अरुण नरके हे सत्तेत असताना गोकुळ विरोधातील मोर्चात ते पुढे राहिले. त्याची परतफेड म्हणून पाटील यांनी नरके यांना पाठिंबा दिला. यामुळे रविवारी झालेल्या मतदानात जसं ठरलंय तसंच करतोय अश्याप्रकरचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत होते. सतेज पाटील यांच्यासह गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांची ही साथ चंद्रदीप नरके यांना मिळाल्याने नरके गटाची ताकद वाढली. याचा प्रभाव विरोधकांवर पडू लागला. विरोधकांनी केलेल्या आरोपांना कोणतीही भीक न घालता मतदारांनी आपले मतदान नरके यांना देत आपला कौल विजयाच्या माध्यमातून दाखवून दिला. प्रचाराच्या काही दिवसांवरच सतेज पाटील यांनी नरके यांना पाठिंबा दिल्यामुळे सतेज पाटील यांचा आमचं ठरलंय पॅटर्न पुन्हा चर्चेत आला आहे.