कोल्हापूर: स्वप्नील हा लहानपनापासूनच अभ्यासात हुशार होता. त्याची शिकण्याची जिद्द होती. त्यानुसार त्याने बी टेक मध्ये प्रवेश घेतला होता. या दरम्यान, 2006 साली आई वैशाली माने यांचे अचानक निधन झाले त्यांच्या पाठोपाठ त्याचे वडील तुकाराम माने यांचेही 2018 मध्ये निधन झाले. वडिलांचा कोल्हापूर येथे फरशी विक्रीचा छोटा व्यवसाय होता. मात्र आई वडिलांचा आधार गेल्यानंतर सुद्धा स्वतःच्या हिंमतीने त्याने शिक्षण पूर्ण केले आणि आज या यशापर्यंत येऊन पोहोचला आहे.
स्वप्नीलच्या घरी आजी, आजोबा एक छोटी बहीण स्नेहल असा परिवार आहे. दुसरी बहिण प्रज्ञा यांचे लग्न झाले आहे. स्वप्नील हा लहानपणापासून वक्तृत्व स्पर्धांमध्ये हिरीरीने भाग घ्यायचा. त्याला आजपर्यंत अनेक ठिकाणी गौरविण्यात आले आहे. अनेक महाविद्यालयांमध्ये त्याला कार्यक्रमांसाठी सुद्धा बोलावले जात होते. विशेष म्हणजे दहावी आणि बारावीच्या मुलांचे तो क्लास सुद्धा घ्यायचा. अभ्यासामध्ये पाहिल्यापासूनच हुशार असल्याने त्याने यूपीएससी हेच ध्येय ठेवले होते.