कोल्हापूर - सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे देशभरासह राज्यातील प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व यात्रा, मेळावे, कुस्ती स्पर्धा, विविध कारणांमुळे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानुसार राधानगरी तालुक्यातील कौलव गावामध्ये आयोजित कुस्त्यांच्या स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.
कोरोना प्रभाव : कोल्हापुरातील कुस्ती स्पर्धा रद्द - कोल्हापूर-कौलव गावातील कुस्ती स्पर्धा रद्द न्यूज
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आदेशानुसार राधानगरी तालुक्यातील कौलव गावामध्ये आयोजित कुस्त्यांच्या स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. गावात रेणुकादेवी भंडारा यात्रा महोत्सवानिमित्त या जंगी निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.
'कोरोना' प्रभाव : कोल्हापुरातील कुस्ती स्पर्धा रद्द
हेही वाचा -कोरोनामुळे ऑस्ट्रेलिया विरूद्ध न्यूझीलंड मालिका रद्द
गावात रेणुकादेवी भंडारा यात्रा महोत्सवानिमित्त या जंगी निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास 15 लाख रुपयांची बक्षिसे या स्पर्धेत ठेवण्यात आली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या कुस्तीच्या स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. मात्र, हीच स्पर्धा काही दिवसांनी पुन्हा घेणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
Last Updated : Mar 14, 2020, 5:21 PM IST