कोल्हापूर- दोन महिन्यांपूर्वी कोल्हापूरवर महापुराचे मोठे संकट ओढवले होते. या महापुरानंतर कोल्हापूर शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सर्वप्रथम खड्डेमुक्त कोल्हापूर बनवणे हाच उद्देश सुरुवातीला डोळ्यांसमोर असल्याचे कोल्हापूर महानगरपालिकेच्या नव्या महापौर सूरमंजिरी लाटकर यांनी म्हटले आहे.
खड्डेमुक्त कोल्हापूर बनवणे हाच मुख्य उद्देश - महापौर - वाहतूककोंडी
कोल्हापूर शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे सर्वप्रथम खड्डेमुक्त कोल्हापूर बनवणे हाच उद्देश सुरुवातीला डोळ्यांसमोर असल्याचे कोल्हापूर महानगरपालिकेच्या नव्या महापौर सूरमंजिरी लाटकर यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना महापौर
शिवाय शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण होत आहे. याबाबत सुद्धा अग्रक्रमाने काम हाती घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महापौर निवडीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी दौलत देसाई यांनी नूतन महापौर लाटकर आणि उपमहापौर संजय मोहिते यांचे तुळशीचे रोप देऊन अभिनंदन केले.
हेही वाचा - सुरमंजिरी लाटकर कोल्हापूरच्या नव्या महापौर, तर उपमहापौरपदी संजय मोहिते
Last Updated : Nov 19, 2019, 3:41 PM IST