कोल्हापूर - लॉकडाऊनमुळे दारू मिळत नसल्याने एका यंत्रमाग कामगाराने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील इचलकरंजीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याण आप्पा तांबे असे यंत्रमाग कामगाराचे नाव आहे.
धक्कादायक ! दारू मिळत नसल्याने कोल्हापुरात यंत्रमाग कामगाराची आत्महत्या - Worker commits suicide
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे तळीरामांची मोठी गोची होत आहे. त्यात आता कोणत्याही मार्गाने दारू मिळत नसल्याने काही तळीराम थेट आत्महत्या करत असल्याचे दिसत.
दारू मिळत नसल्याने यंत्रमाग कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या
हेही वाचा...डॉक्टरांची चिठ्ठी आणल्यास मद्यपींना मिळणार दारू, राज्य सरकारचा निर्णय
महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे दारूची सर्व दुकाने बंद आहेत. मात्र, दारू मिळत नसल्याने इचलकरंजी येथील हताश झालेल्या कल्याण तांबे या यंत्रमाग कामगाराने गळफास घेत आत्महत्या करण्याचे पाऊल उचलले आहे.