पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीची कोल्हापूरची तयारी पूर्ण; निवडणूक प्रशासन सज्ज - कोल्हापूर शिक्षक पदवीधर आमदार
राज्यात सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. १ डिसेंबरला त्यासाठी मतदान होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी देसाई यांनी दिली.
कोल्हापूर - येत्या 1 डिसेंबरला शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेमध्ये मतदान होणार आहे. या मतदानाची जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. या मतदानासाठी जवळपास 2000 हून अधिक कर्मचारी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
व्हीसीद्वारे जिल्ह्यातील आढावा -
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी संवाद साधला. शिवाय तेथील तयारीबाबत त्यांनी आढावा घेत मतदान सुरळीत पार पडावे याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या आहेत याची माहिती घेतली.