कोल्हापूर- सध्या देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थी इतर राज्यात अडकले आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील काही विद्यार्थी मध्य प्रदेशातील इंदौर येथे अडकले आहेत. त्यांना परत कोल्हापुरात आणण्यासाठी कोल्हापूर प्रशासनाने इंदौर प्रशासनाला पत्र लिहिले आहे.
कोल्हापुरातील विद्यार्थी अडकले इंदौरमध्ये, प्रशासनाने इंदौर जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला मेल - student stuck in indore
कोल्हापुरातील शिक्षकांसह एकूण 34 विद्यार्थी हे इंदौर येथे लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. हे विद्यार्थी एसएससीच्या ट्रेनिंगसाठी लॉकडाऊन सुरू होण्याआधी इंदौरमध्ये गेले होते. त्यानंतर 24 मार्चला लॉकडाऊनची घोषणा झाली आणि हे विद्यार्थी इंदौरमध्येच अडकले.
कोल्हापुरातील शिक्षकांसह एकूण 34 विद्यार्थी हे इंदौर येथे लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. हे विद्यार्थी एसएससीच्या ट्रेनिंगसाठी लॉकडाऊन सुरू होण्याआधी इंदौरमध्ये गेले होते. त्यानंतर 24 मार्चला लॉकडाऊनची घोषणा झाली आणि हे विद्यार्थी इंदौरमध्येच अडकले. हे सर्व विद्यार्थी सध्या एका हॉटेलमध्ये राहत असून इंदौर पोलिसांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.
दरम्यान, या अडकलेल्या विद्यार्थ्याना कोल्हापुरात परत आणण्यासाठी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी इंदौरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मेल केला आहे. हे सर्व विद्यार्थी कोल्हापुरातील असून त्यांना आम्ही घेण्यास तयार असून, तुम्ही परवानगी व योग्य ती खबरदारी घेऊन त्यांना पाठवण्याची विनंती या मेलमध्ये कोल्हापूर प्रशासनाने इंदौर प्रशासनाला केली आहे. अद्यापपर्यंत या मेलला कोणतेही उत्तर मिळाले नाही.