महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

#SocialDistancing : पंतप्रधानांच्या आवाहनाला कोल्हापुरकरांचा चांगला प्रतिसाद ! - Kolhapur citizens

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संबोधित करताना, १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊनची घोषणा केली. तसेच कोरोनाला हरवण्यासाठी नागरिकांनी घरातच रहावे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन केले होते.

kolhapur market
कोल्हापूर भाजी मार्केट

By

Published : Mar 25, 2020, 3:12 PM IST

कोल्हापूर - कोरोना विषाणू जगभरात मोठ्या झपाट्याने पसरत आहे. अनेक उपाययोजना करून सुद्धा अनेक देशांमध्ये कोरोनाचे आव्हान दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू होऊ नये, यासाठी गर्दी टाळण्याचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन कले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या सोशल डिस्टन्सिंगच्या आवाहनाला कोल्हापूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळताना पहायला मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोशल डिस्टन्ससिंगच्या आवाहनाला कोल्हापुरकरांचा चांगला प्रतिसाद...

हेही वाचा...जान है तो जहान है... आज मध्यरात्रीपासून २१ दिवस देश लॉकडाऊन - पंतप्रधान मोदी

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे लोक काही ठिकाणी गर्दी करतात. ही गर्दी टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन पुढचे 21 दिवस संपूर्ण भारत लॉकडाउन करण्याचा आदेश दिला. या शिवाय लोकांना अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचे आवाहन केले.

लोकांनी किराणा किंव्हा भाजी खरेदीसाठी गेल्यानंतर एकमेकांमध्ये किमान 3 फूट अंतर ठेवण्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात सुद्धा भाजी मंडई तसेच किराणा दुकानासमोर लोकांना एकमेकांपासून दूर ठेवण्यासाठी महानगरपालिकेने बॉक्स मार्क केले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात का असेना, नागरिक एकमेकांमध्ये अंतर ठेवून खरेदी करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details