महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kolhapur BJP: मुख्यमंत्री असताना 'मातोश्री'चा उंबरठा न ओलांडणारे आता बांधावर जाण्याचे नाटक करताहेत - भाजप

मुख्यमंत्री असताना ज्यांनी मातोश्रीचा उंबरठाही ओलांडला नाही ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता सत्ता गेल्यावर बांधावर जाण्याचे नाटकं करत आहेत, असा टोला भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे (Rahul chikode) यांनी लगावला आहे. (Uddhav Thackeray visits to dam)

Rahul chikode
राहूल चिकोडे

By

Published : Oct 29, 2022, 5:10 PM IST

कोल्हापूर: मुख्यमंत्री असताना ज्यांनी मातोश्रीचा उंबरठाही ओलांडला नाही ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता सत्ता गेल्यावर बांधावर जाण्याचे नाटकं करत आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना संकटातील शेतकऱ्यांना किती मदत दिली याचा हिशोब द्यावा आणि मगच शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जावे, असा टोला भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे (Rahul chikode) यांनी लगावला आहे. (Uddhav Thackeray visits to dam).

उद्धव ठाकरेंच्या ढोंगीपणाला शेतकरी बळी पडणार नाहीत:महाराष्ट्रातील शेतकरी हुशार आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या या ढोंगीपणाला ते बळी पडणार नाहीत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना अनेकदा अतिवृष्टी, गारपीट या सारख्या संकटांना तोंड द्यावे लागले. मात्र त्यावेळी ठाकरेंनी एकदाही घराचा उंबरठा ओलांडून शेतकऱ्यांची भेट घेण्याचे सौजन्य दाखविले नव्हते. शेतकऱ्यांना एक पैशाचीही मदत न करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना विदेशी दारूवरील कर 300 टक्क्यांवरून 150 टक्क्यांवर आणला होता, हे महाराष्ट्राची जनता कधीही विसरणार नाही. सत्तेवर येण्यापूर्वी याच उद्धव ठाकरेंनी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये मदत देण्याची मागणी केली होती. मात्र सत्तेत आल्यानंतर ठाकरे सरकारने संकटातील शेतकऱ्यांना एक दमडीही दिली नाही. हेच उद्धव ठाकरे आता सत्ता गेल्यावर शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करीत आहेत. तुमच्या सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा हिशोब द्या आणि मगच शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जा, असेही जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीची घोषणा कागदावरच राहिली:उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा कागदावरच राहिली आहे. त्यावेळी उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांना आपल्या सरकारच्या तिजोरीतून काही द्यावेसे वाटले नाही. शिंदे-फडणवीस सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा करणे सुरूही केले आहे, असेही चिकोडे यांनी म्हंटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details