महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

किरीट सोमैया आज कोल्हापूर दौऱ्यावर; पोलिसांच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना नोटीस - kirit somaiya visit to kolhapur

भाजपाचे नेते किरीट सोमैया आज 28 सप्टेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ताराराणी चौक, अंबाबाई मंदिर, संताजी घोरपडे साखर कारखाना, मुरगुड पोलीस ठाणे या ठिकाणी पोलिसांनी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला आहे.

किरीट सोमैया ताज्या बातम्या
किरीट सोमैया ताज्या बातम्या

By

Published : Sep 28, 2021, 7:27 AM IST

Updated : Sep 28, 2021, 8:05 AM IST

कोल्हापूर - ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केल्यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमैया हे आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. घोटाळ्याबाबत ते सकाळी 11 वाजता मुरगूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सायंकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला असून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

भाजपाचे नेते किरीट सोमैया आज 28 सप्टेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ताराराणी चौक, अंबाबाई मंदिर, संताजी घोरपडे साखर कारखाना, मुरगुड पोलीस ठाणे या ठिकाणी पोलिसांनी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला आहे. दरम्यान, दौऱ्याच्या नियोजनात बदल झाला असून संताजी घोरपडे कारखान्यावर भेट देण्याचा निर्णय त्यांनी रद्द केला असून केवळ मुरगूड पोलीस ठाण्यात ते तक्रार देण्यासाठी जाणार आहेत. त्यानंतर सायंकाळी चार वाजता हॉटेल अयोध्या येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. सकाळी 11 वाजता ते कोल्हापुरातील ताराराणी चौकात दाखल होतील. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे स्वागत होईल. त्यानंतर ते करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन मुरगूडकडे रवाना होणार आहेत. सायंकाळी चार वाजता ते पत्रकाराशी संवाद साधल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. रात्री आठ नंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. दरम्यान, किरीट सोमैया यांच्यासोबत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, खासदार गोपाळ शेट्टी हेदेखील कोल्हापुरात येणार असल्याचे वृत्त आहे.

पोलिसांची कार्यकर्त्यांना नोटीस -

मुरगूड आणि परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. भाजप नेते किरीट सोमैया यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा नोटीस देण्यात आल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. विरोध किंवा समर्थनासाठी गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच कार्यकर्त्यांनी एकत्र येऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

'सोमैयांसाठी जिल्हाबंदीचा आदेश रद्द' -

किरीट सोमैय हे आज कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होणार नाही, याची खात्री केल्यानंतर आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सोमैयांसाठीचा जिल्हाबंदीचा आदेश रद्द केला आहे. आदेशात म्हटले आहे की, सोमैया संबंधित कार्यकर्ता आणि राजकीय पक्षाकडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याची खात्री केली आहे. तसा अहवाल मुरगूड पोलीस ठाण्याकडून प्राप्त झाला आहे. गोपनीय खात्याकडून ही तसेच स्पष्ट झाले आहे. त्यावरून किरीट सोमैया यांचा जिल्हादौऱ्याबाबत कोणतीही अडचण येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हा बंदीचा आदेश रद्द करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितला आहे.

हेही वाचा -Weather Update : राज्यात मंगळवारी आणि बुधवारी अतिवृष्टी; हवामान विभागाचा अंदाज

Last Updated : Sep 28, 2021, 8:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details