कोल्हापूर - एमआयएम पक्ष महाविकास आघाडी सोबत गेला तरी काहीच फरक पडणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil on MIM ) यांनी दिली. असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष महाविकास आघाडीबरोबर जाण्यासाठी इच्छुक असून त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे ( Rajesh Tope & Imtiaz Zalil Meeting ) यांची भेट घेऊन तयारी दर्शवली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या कानावर देखील घालण्याचे आवाहन त्यांनी केले. भाजपला हरवण्यासाठी सर्वजण एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
माध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ते एकमेकांचा हात घट्ट धरायचा प्रयत्न करतायेत -
राज्यातील अनेक प्रलंबित महत्त्वाच्या प्रश्नांकडे मालकच सकाळी दुर्लक्ष करत असल्याने जनतेमध्ये सध्या महा विकास आघाडी बद्दल असंतोषाचे वातावरण आहे. आम्ही भ्रष्टाचाराचे गरदन काळ असल्याने विरोधकांमध्ये आमची एवढी भीती निर्माण झाली आहे की एकमेकाचे हात घट्ट धरायचा प्रयत्न करत आहेत. मात्र, प्रयत्न करूनही अपयश आल्यानंतर त्यांची पुन्हा फाटाफूट होईल. आम्ही सहयोगी मिळून महाविकास आघाडीला टक्कर द्यायला समर्थ आहोत असे ही ते म्हणाले आहेत.
फडणवीस यांनी अर्थ संकल्पाची अधिवेशनात चिरफाड केली -
यावेळी मांडलेल्या अर्थ संकल्पाची फडणवीस यांनी अधिवेशनात चिरफाड केली आहे. यामध्ये सर्वाधिक निधी राष्ट्रवादीला जातोय. त्यामुळे बाकी पक्षातील आमदारांची नाराज होते. यानंतर धावपळ करून मीटिंग करून सर्व आमदारांना 5 कोटी दिले. या अधिवेशनात 2 हजार कोटी रस्त्यासाठी दिला. तर तिकडे शेतकरी अस्वस्थ आहे. त्याला 1 रुपयाही दिला जात नाही. विकास कामांसाठी आमदारांना निधी कशाला द्यायचा? असा सवाल त्यांनी चंद्रकांत पाटील यांनी केला. आमदारांना निधी दिल्यास ते त्यांना पाहिजे तिथे खर्च करणार आहेत. शिवसेनेच्या आमदारांना फक्त रस्त्यांसाठी 2 कोटी रुपये दिले आहेत. तर ही रक्कम जास्तच आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे जे बोलले ते जगजाहीर आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा -VIDEO : जलील यांचा आघाडीचा प्रस्ताव तर राऊत म्हणाले की....
भाजप पदाधिकार्यांनी घेतली राजू शेट्टी यांची भेट -
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी हे महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याने ते बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन आमच्यासोबत आला तर आम्ही स्वागतच करू, असे देखील त्यांना म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी सरकार पाडण्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन करत आहोत. आम्हाला कोणी बांधलेले नाही असेही ते म्हणाले.