महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'मनसेच्या झेंड्यावरील राजमुद्रा हा शिवप्रेमींचा अवमान' - इतिहास संशोधक इंद्रजित सावंत

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदेश पत्रावरच ही राजमुद्रा उमटवली जायची. तिचा इतरत्र वापर झाला नव्हता. पण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्यावर वापरण्यात आलेल्या राजमुद्रेचा आकार वाकडा तिकडा केला आहे. ही राजमुद्रेची नक्कल आहे, असे सावंत यांनी सांगितले आहे.

Indrajit Sawant
इंद्रजित सावंत

By

Published : Jan 23, 2020, 7:10 PM IST

कोल्हापूर- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्यावर वापरलेली राजमुद्रा ही बोगस आणि नकली आहे. हा प्रकार अपमानजक आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावणारा आहे. आपल्या राजकीय फायद्यासाठी ऐतिहासिक राजमुद्रा वापरणे अतिशय चुकीचे आहे, त्यामुळे झेंड्यावरुन राजमुद्रा तत्काळ हटविण्यात यावी, अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केली आहे.

हेही वाचा - वांद्र्यात शिवसेनेच्या जल्लोषाची जोरदार तयारी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदेश पत्रावरच ही राजमुद्रा उमटवली जामयची. तिचा इतरत्र वापर झाला नव्हता. पण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्यावर वापरण्यात आलेल्या राजमुद्रेचा आकार वाकडा तिकडा केला आहे. ही राजमुद्रेची नक्कल आहे. राज ठाकरे हे शिवप्रेमी आहेत, हे आम्हाला मान्य आहे. ते आणि त्यांचे गुरू बाबासाहेब पुरंदरे हे इतिहासाचे जाणकार असल्याचे सांगतात. पण, त्यांनी मनसेच्या झेंड्यावर वापरली जाणारी राजमुद्रा, तिची कॅलिग्राफी याबद्दलही काळजी घेतली नसल्याचे दिसते. अस्सल आणि नक्कल याच्यातील फरक राज ठाकरे यांनाही कळाला नाही याचे विशेष वाटते, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

काही लोक वैयक्तिक प्रेमाने आणि आदरातून आपल्या वाहनांवर, घरामध्ये राजमुद्रेचे स्टिकर लावतात त्यांनी सुद्धा काळजी घेणे गरजेचे, असल्याचे सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा - 'समाजात फूट पाडणाऱ्या भाजपबद्दल विचार करावाच लागेल'

ABOUT THE AUTHOR

...view details