कोल्हापूर- मटणाचं नाव काढलं तर तोडांला पाणी सुटतयं. अनं त्यात कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा म्हटल्यावर तर विचारूच नका. पण, आता तुमच्या जिभेला जरा आवर घाला. कारण, सध्या मटण खिशाला परवडेना झाले आहे. 500 रुपये किलो दराने मिळणारे मटण आता 600 रुपयाला झाले आहे.
कोल्हापुरात मटणाचे दर कडाडले कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा जगात भारी आहे. मात्र, मटणाचे दर वाढल्याने खवय्यांनी नाराजी व्यक्त केलीय. किलो मागे 100 ते 150 रुपये दरवाढ होऊन मटणाचा दर 600 रुपये झाला आहे. बावडामध्ये तर या मटण दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - ऊस आंदोलनाला हिंसक वळण, एक ट्रॅक्टर पेटवला
तर नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात मेंढ्या आणि शेळ्या मरण पावल्या आहेत. तसेच आमचे मटन हे एका शिट्टीत शिजते तर इतरांचे मटण 2 ते 3 शिट्टयांमध्ये शिजते, असे अजब तर्क एका मटण विक्रेत्याने लावला आहे. त्यामुळेच मटणाचे भाव वाढत असल्याचे मटण विक्रेत्याने सांगितले आहे.
हेही वाचा - खड्डेमुक्त कोल्हापूर बनवणे हाच मुख्य उद्देश - महापौर
कोल्हापुरात आठवड्यातून किमान दोनदा तरी मटण खाल्ले जाते. त्यामुळे मटन विक्री दुकानात हमखास खवय्यांची गर्दी असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भरमसाट दरवाढीमूळे मटनप्रेमींना खवय्येगिरीला आळा घालण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ही दरवाढ लवकरात-लवकर कमी व्हावी, अशी कोल्हापूरकरांची इच्छा आहे.