कोल्हापूर - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरासह साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. त्याचबरोबर प्राप्तिकर विभागाने हसन मुश्रीफ यांच्या मुलाच्या आणि टाकाळा परिसरात राहणाऱ्या साडूच्या घरी देखील छापा टाकल्याची माहिती मिळत आहे.
राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरासह कारखान्यावर प्राप्तिकर विभागाचे छापे - साखर कारखान्यावर
हसन मुश्रीफ यांच्या घरी, साखर कारखान्यांवर तसेच त्यांच्या मुलाच्या आणि साडूच्या घरी प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्याची माहिती मिळत आहे.
आमदार हसन मुश्रीफ
याबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही, पण हसन मुश्रीफ यांच्या संपत्तीवर प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्याच्या माहितीने जिल्ह्यात तसेच राष्ट्रवादीच्या गोठात एकच खळबळ उडाली आहे. सोबतच उलट सुलट चर्चांना सुद्धा उधाण आले आहे.
Last Updated : Jul 25, 2019, 12:23 PM IST