सिंधुदुर्ग - गोवा बनावटीच्या दारूच्या अवैध वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. इन्सुली येथील पथकाने केलेल्या कारवाईमध्ये १ लाख ३५ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात विदेशी ब्रँडची दारू आणि टाटा एस गाडीचा समावेश आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचला होता. संशयित वाहनाची सावंतवाडी-आंबोली रस्त्यावर सांगेली धवडकी तिठा येथे तपासणी करण्यात आली.
उत्पादन शुल्क विभागाची अवैद्य दारू वाहतुकीवर कारवाई; १ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल जप्त - goa made alcohol
सावंतवाडी: कोल्हापूर येथे गोव्यात बनवलेल्या दारूची अवैध वाहतूक सुरू असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. इन्सुली येथील पथकाने केलेल्या कारवाईमध्ये १ लाख ३५ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जप्त केलेल्या वाहनासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक
यावेळी टाटा एस (एमएच 13 एएक्स 8017) गाडीतून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. हा मद्यसाठा गोव्याहून आंबोलीमार्गे कोल्हापूर येथे नेण्यात येणार होता. याप्रकरणी गाडी चालक सुनील बंडा शिंदे (रा. कोल्हापूर) याला ताब्यात घेण्यात आले आहे.