कोल्हापूर- घरी उपचार घेणाऱ्या कोविड रुग्ण व संशयितांनी नियम मोडले, तर त्यांना थेट कोविड सेंटर मध्ये पाठवण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी दिला आहे. नियम मोडणाऱ्यांची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई करा, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर शहरातील कोरोनाची परिस्थिती गंभीर बनत आहे. जवळपास १ हजार ९ रुग्ण घरातून उपचार घेत आहेत. तर काही संशयित रुग्ण देखील उपचार घेत आहेत. यातील काही रुग्ण नियम मोडून बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी नियम मोडणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नसल्याने उपायुक्तांना नोटीस-