महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मानवी साखळी करून शहरात तरुणाईत मतदान जागृती

तरुणाई मतदानासाठी बाहेर पडत नाही. याच पार्श्वभूमीवर तरुणाईला मतदानाचे महत्त्व सांगण्यासाठी कोल्हापूर शहरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने 'आय वुईल वोट' हा उपक्रम राबवण्यात आला.

मानवी साखळी करून शहरात तरुणाईत मतदान जागृती

By

Published : Mar 3, 2019, 2:38 PM IST

कोल्हापूर - जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापूरमध्ये 'आय वुईल वोट' (I WILL VOTE) हा उपक्रम राबवण्यात आला. शहरातील रस्त्यांवर येऊन हजारो विद्यार्थी-विद्यार्थींनी या उपक्रमात सहभाग घेतला. या उपक्रमामुळे आगामी निवडणुकांमध्ये मतांची टक्केवारी निश्चित वाढेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

देशात सर्वात जास्त मतदान हे तरुणांचे आहे. मात्र, हीच तरुणाई मतदानासाठी बाहेर पडत नाही. याच पार्श्वभूमीवर तरुणाईला मतदानाचे महत्त्व सांगण्यासाठी शहरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने 'आय वुईल वोट' हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमासाठी ऐतिहासिक बिंदू चौकात हजारो तरुण उपस्थित होते.

मानवी साखळी करून शहरात तरुणाईत मतदान जागृती

बिंदू चौकापासून जयंती नाला, शिवाजी चौक, राजारामपुरी, मिरजकर तिकटी अशा सर्वच मार्गांवर विद्यार्थ्यांनी मानवी साखळी केली. शिवाय यावेळी पथनाट्य, पोवाडे यांच्या माध्यमातून जागृती करण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान यंत्रे ठेवण्यात आली होती. त्याच्या माध्यमातून मतदान कसे करावे, याचे मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून मतदान जागृतीसाठी सर्वांना आवाहन केले असून यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details