महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात पावसाचा जोर कायम; 27 हून अधिक बंधारे पाण्याखाली - Chandgad

गेल्या २४ तासांहून अधिक वेळ पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील २७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे.

पावसाचे दृष्य

By

Published : Jul 27, 2019, 11:53 AM IST

कोल्हापूर- मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. गेल्या २४ तासांहून अधिक वेळ पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील २७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर राधानगरी धरण ८४ टक्के भरले आहे.

कोल्हापुरातील मुसळधार पावसाचे दृष्य

जिल्ह्यातील पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, चंदगडमध्ये अतिवृष्टी सुरू असून अनेक नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये जनजीवन ठप्प झाले आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी २७.४ फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे यंदा दुसऱ्यांदा पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर नदी लवकरच धोक्याची पातळी गाठेल, अशी परिस्थिती आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details