कोल्हापूर - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीप प्रज्ज्वलनाच्या घोषणेवर आक्षेप घेतला आहे. हा निर्णय मोदींनी मागे घेण्याची विनंती त्यांनी केलीय. तसेच दिवे लावून कोरोनावर उपचार होणार नाहीत, असे ते म्हणाले.
मोदींनी दिवे लावण्याचा निर्णय मागे घ्यावा - हसन मुश्रीफ - hasan mushrif news
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीप प्रज्ज्वलनाच्या घोषणेवर आक्षेप घेतला आहे. हा निर्णय मोदींनी मागे घेण्याची विनंती त्यांनी केलीय. तसेच दिवे लावून कोरोनावर उपचार होणार नाहीत, असे ते म्हणाले.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना येत्या रविवारी (5 एप्रिल) रात्री नऊ वाजता सर्वांनी लाईट्स बंद करून दिवे लावण्याची विनंती केली आहे. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हेतू त्यांनी बोलून दाखवलाय. तसेच एकत्रित लढण्याचे आवाहन केले आहे. या निर्णयावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आक्षेप घेतला आहे. आपण देशासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी काय करणार आहोत, तसेच कोरोनावर कशी मात करणार आहोत, हे सांगण्याची गरज होती, पण हे झालं नाही, असे मुश्रीफ म्हणाले. तसेच अशा पद्धतीचे प्रयोग केल्याने लोक पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वाढेल,असे ते म्हणाले.
लोकांमध्ये अजूनही कोरोनाबाबत गांभीर्य नाही. टाळ्या वाजवायला सांगितल्या, त्या वेळी देखील लोकांनी सोशल डिस्टन्सिंगच्या धज्ज्या उडवल्या. त्यामुळे आता पुन्हा असे प्रयोग केल्याने लोक एकत्र येण्याची भीती मुश्रीफ यांनी व्यक्त केली आहे.