महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'चंद्रकांत पाटलांना सत्ता गेल्याच्या धक्क्यातून सावरण्याची शक्ती मिळो'

आमच्या सरकारला लोखंडी चाक आहेत. त्यामुळे टायर बदलण्याचा प्रश्नच नाही, असेही मुश्रीफ म्हणाले. दरम्यान, गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनीसुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील हे एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी वैयक्तिक टीका करणे बंद केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

By

Published : Jan 16, 2020, 11:49 PM IST

Updated : Jan 17, 2020, 12:34 AM IST

कोल्हापूर - चंद्रकांत पाटील यांना सत्ता गेल्याचा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरण्याची परमेश्वराने त्यांना शक्ती द्यावी, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. टायर बदलायच्या आत सरकार बदलेल, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

हेही वाचा -छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजापर्यंत कुठे पोहोचलात?

आमच्या सरकारला लोखंडी चाक आहेत. त्यामुळे टायर बदलण्याचा प्रश्नच नाही, असेही मुश्रीफ म्हणाले.

दरम्यान, गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनीसुद्धा चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील हे एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी वैयक्तिक टीका करणे बंद केले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. आमच्याकडे अनेक गोष्टी कुठून आल्या, असे चंद्रकांत पाटील विचारतात. त्याचा हिशोब द्यायला मी कधीही तयार असून त्यांनी फक्त वेळ आणि ठिकाण सांगावे, असेही सतेज पाटील यांनी म्हटले आहे. गोकुळच्या निवडणुकीमध्ये आमचाच विजय होणार, अशी ग्वाही सतेज पाटील यांनी यावेळी दिली आहे.

Last Updated : Jan 17, 2020, 12:34 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details