महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Hapus Enters The Market : अबब... हापूसच्या पेटीला मिळाला 40 हजार 500 चा उच्चांकी दर - कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती

फळांचा राजा हापूस (Hapus, the king of fruits) यावर्षी बाजारात दाखल झाला आहे. मुहूर्ताच्या सौदयामध्ये हापूसच्या 4 डझनच्या पेटीला आजवरचा उच्यांकी 40 हजार 500 रुपये इतका उच्चांकी दर ( got a high rate of 40 thousand) मिळाला. गेल्या वर्षी 30 हजार रुपये इतका दर मिळाला होता. त्यामुळे यावर्षीचा दर आजवरचा सर्वात उच्चांकी ठरला आहे. देवगड मधून आलेल्या आंब्याला हा दर मिळाला. असून कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Kolhapur Market Committee) प्रशासक के. पी. पाटील यांच्या उपस्थितीत हा सौदा निघाला.

Hapus Enters The Market
हापूस बाजारात दाखल

By

Published : Feb 9, 2022, 12:55 PM IST

Updated : Feb 9, 2022, 1:36 PM IST

कोल्हापुर: कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून काल 4 डझन आंब्याच्या 4 पेट्या तसेच काही बॉक्सची आवक झाली. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामातील पहिल्या आंब्याची ही आवक होती. दरवर्षी मुहूर्ताच्या सौदयाला चांगला दर मिळत असतो. गेल्या वर्षी 30 हजार दर मिळाला होता, मात्र यावर्षी विक्रमी 40 हजार 500 रुपये दर मिळाला. तीन पेट्यांचे सौदे झाले यामध्ये सुरुवातीला पहिल्या पेटीला 28 हजार 111 रुपये इतका दर मिळाला.

हापूस बाजारात दाखल

दुसऱ्या पेटीला 31 हजारांचा दर मिळाला तर तिसऱ्या पेटीला आजवरचा सर्वात उच्चांकी दर मिळाला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक के. पी. पाटील म्हणाले, दरवर्षी सुरुवातीला आंब्याला चांगला दर मिळत असतो. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा चांगले दर मिळतात. त्यांना सुद्धा त्याचे समाधान असते. हळू हळू सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा खाता येतील असे दर येतील असेही त्यांनी म्हंटले.

हापूस बाजारात दाखल
Last Updated : Feb 9, 2022, 1:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details