कोल्हापूर- कोंबडी खाल्ल्याने कोरोना विषाणूची लागण होते, या अफवेमुळे पोल्ट्री व्यवसायावर मोठे संकट कोसळले आहे. कोरोनाच्या भीतीपोटी नागरिक चिकन घेत नसल्याने राज्यातील पोल्ट्री धारकांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे, नैसर्गिक आपत्तीवेळी आर्थिक मदत केली जाते त्याच पद्धतीने मदत करून सरकारने प्रति पक्षी किमान ५० रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.
'सरकारने पोल्ट्री धारकांना प्रति पक्षी ५० रुपये नुकसान भरपाई द्यावी' - चिकन व्यवसाय संकट कोल्हापूर
चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, अशी अफवा पसरल्याने चिकनच्या विक्रीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे, आता ७० रुपयाला तयार होणारी कोंबडी १० रुपयाला विकण्याची वेळ पोल्ट्री धारकांवर आली आहे.
चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, अशी अफवा पसरल्याने चिकनच्या विक्रीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे, आता ७० रुपयाला तयार होणारी कोंबडी १० रुपयाला विकण्याची वेळ पोल्ट्री धारकांवर आली आहे. यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. शासनाने याबाबत विचार करून प्रति पक्षी ५० रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि पोल्ट्री धारकांना या संकटातून बाहेर काढावे, अन्यथा हे व्यवसायिक उद्ध्वस्त झाल्या शिवाय राहणार नाहीत, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.