कोल्हापूर: प्रमोद सावंत हे बारावी नंतर वैद्यकिय शिक्षणासाठी कोल्हापुरात आले. (Kolhapur connection of Pramod Sawant) येथील गंगा एज्युकेशन सोसायटीच्या आयुर्वेदिक महाविद्यालयात त्यांनी 1992 साली वैद्यकिय अभ्यासक्रमाच्या शिक्षणाला प्रारंभ केला. 1997 साली त्यांनी शिवाजी विद्यापीठातून पदवी घेतली. आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांच्या खऱ्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. कारण शिक्षण घेत असतानाचा त्यांनी महाविद्यालयात सगळ्यात आधी जनरल सेक्रेटरी अर्थात जीएस पदाची निवडणूक लढले ( the first election in Kolhapur )आणि ही निवडणुक ते भरघोस मतांनी विजयी होत जीएसही झाले. इथेच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.
अंबाबाईवर प्रचंड श्रद्धा; दरवर्षी न चुकता दर्शन: डॉ. प्रमोद सावंत यांचे कोल्हापूरातील अनेक किस्से आहेत. इथे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. काही जण आजही कोल्हापूरात आहेत तर काही कामानिमित्त बाहेर आहेत. शिक्षण घेत असताना त्यांनी खूप दंगा मस्तीही केल्याचे सांगितले जाते. काळा तर त्यांचे आवडते ठिकाण. सायंकाळी नेहमी ते रांकळ्यावर जायचे. सावंत यांची अंबाबाई वर प्रचंड श्रद्धा आहे. शिक्षण घेताना सुद्धा ते नेहमी दर्शनासाठी जायचे.आता सुद्धा ते अंबाबाईचे दर्शन घेऊन गेले. दरवर्षी न चुकता ते इथे येत असतात तसेच त्यांच्या काही जुन्या मित्रांना पण भेटतात.