कोल्हापूर- इचलकरंजीमधील 4 वर्षीय बालकाने कोरोनावर विजय मिळवला आहे. 14 दिवसानंतर त्याचे दोन्ही कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने मंगळवारी त्याला रूग्णालयातून टाळ्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज देण्यात आला. त्याला आता हातकणंगले येथील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले आहे.
आनंदाची बातमी...इचलकरंजीतील 4 वर्षीय बालकाचा कोरोनावर विजय; दोन्ही अहवाल निगेटिव्ह - corona
इचलकरंजीमधील पहिले कोरोनाबाधित रुग्ण असणाऱ्या आजोबांच्या संसर्गात हा 4 वर्षीय नातू आला होता. २० एप्रिल रोजी त्याला आयजीएममध्ये दाखल करुन त्याचा स्वॅब घेतला होता. यामध्ये या बालकाला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.
इचलकरंजीमधील पहिले कोरोनाबाधित रुग्ण असणाऱ्या आजोबांच्या संसर्गात हा 4 वर्षीय नातू आला होता. २० एप्रिल रोजी त्याला आयजीएममध्ये दाखल करुन त्याचा स्वॅब घेतला होता. यामध्ये या बालकाला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, 14 दिवसानंतर घेतलेल्या दोनी स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला कोरोनामुक्त घोषित करून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मंगळवारी 5 वाजण्याच्या दरम्यान रूग्णालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात बालकाला डिस्चार्ज दिला. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी या बालकाला तसेच त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे पुष्पगुच्छ देवून कौतुक केले.