महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजाराम बंधाऱ्यावरून गाडी पाण्यात कोसळली, चालक सुखरूप

वडणगे आणि कसबा बावड्याला जोडणाऱ्या राजाराम बंधाऱ्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करत असतात. हा बंधारा अरुंद असल्याने यावरून वाहतूक करताना कायम धोका असतो. आज पुलावरून एक गाडी खाली पडल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दोन्ही बाजूला सुरक्षा कठडे बसविण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

four-wheleer-car-drown-in-water-in-kolhapur-driver-is-safe
राजाराम बंधाऱ्यावरून चार चाकी गाडी पाण्यात कोसळली, वाहन चालक सुखरूप

By

Published : Oct 4, 2020, 7:29 PM IST

कोल्हापूर -कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावरून दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एक गाडी खाली पाण्यात कोसळल्याची घटना घडली. यामधील चालक सुखरुप बाहेर आला आहे. संबंधित घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

राजाराम बंधाऱ्यावरून चार चाकी गाडी पाण्यात कोसळली

वडणगे आणि कसबा बावड्याला जोडणाऱ्या राजाराम बंधाऱ्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करत असतात. हा बंधारा अरुंद आहे. तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंना सुरक्षा कठडे सुद्धा नाही. यावरून वाहतूक करताना कायम धोका असतो. एका वेळी एकच वाहन यावरून जाऊ शकते. अनेकवेळा काहीजण खाली पडता पडता वाचले आहेत. मात्र आज पाहिल्यांदा पुलावरून एक गाडी खाली पडल्याची घटना घडली आहे. यातील वाहनचालक स्वतः पाण्यातून पोहत सुखरूप बाहेर पडला. ही गाडी वडणगे मार्गे कसबा बावड्याकडे येत असताना ही घटना घडली. या घटनेमुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दोन्ही बाजूला सुरक्षा कठडे बसविण्याची स्थानिकांतून मागणी होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details