कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीला पूर आल्याने आसपासच्या गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी ग्रामस्थांची जीवघेणी वाहतूक सुरू आहे.
जांभळी खोऱ्याला बेटाचे स्वरुप, जीवनावश्यक वस्तूंसाठी पुरातून नागरिकांची जीवघेणी वाहतूक - कोल्हापूर पूर
पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीला पूर आल्याने आसपासच्या गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी ग्रामस्थांची जीवघेणी वाहतूक सुरू आहे.
जांभळी खोऱ्याला बेटाचे स्वरुप...जीवनावश्यक वस्तूंसाठी पुरातून नागरिकांची जीवघेणी वाहतूक
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास सर्व धरणं भरली आहेत. त्यामुळे सध्या धरणांतून विसर्ग सुरू आहे. यामुळे नद्यांचे प्रवाह वाढले आहेत. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने कृष्णेला पूर आला आहे. सांगली आणि कोल्हापुरातील अनेक भागांत पाणी शिरले असून स्थानिकांच्या स्थलांतराचे काम अद्याप सुरू आहे. यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि जिल्हा प्रशासन सक्रिय झाले आहेत.