महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात 3 रुग्ण वाढले तर 5 जणांची कोरोनावर मात; अ‌ॅक्टिव्ह रुग्ण संख्या 89 - कोरोना बाधित रूग्ण कोल्हापूर

जिल्ह्यात आजअखेर एकूण 89 कोरोनाबाधित रूग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली. शनिवारी रात्री 8 वाजेपर्यंत आलेल्या 3 पॉझीटिव्ह अहवालांमध्ये करवीर तालुक्यातील 2 आणि कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील एकाचा समावेश आहे.

kolhapur corona news
kolhapur corona news

By

Published : Jun 13, 2020, 9:29 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात शनिवार (13 जून) अखेर एकूण 713 रूग्णांपैकी 616 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रात्री 8 वाजेपर्यंत 214 प्राप्त अहवालांपैकी 206 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर प्राप्त अहवालांपैकी 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

उर्वरित पाच अहवालांपैकी 3 जणांचे अहवाल नाकारण्यात आले आहेत. तर एक रूगण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून त्याचाही अहवाल निगेटीव्ह आला असून एका रूग्णाचा अहवाल पुर्नतपासणीत पॉझिटिव्ह आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 89 कोरोनाबाधित रूग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी दिली. शनिवारी रात्री 8 वाजेपर्यंत आलेल्या 3 पॉझीटिव्ह अहवालांमध्ये करवीर तालुक्यातील 2 आणि कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील एकाचा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :

आजरा - 74

भुदरगड - 71

चंदगड - 75

गडहिंग्लज - 81

गगनबावडा - 6

हातकणंगले - 9

कागल - 57

करवीर - 21

पन्हाळा - 27

राधानगरी - 64

शाहुवाडी - 176

शिरोळ - 7

नगरपरिषद क्षेत्र - 11,

कोल्हापूर महापालिका क्षेत्र -26

असे एकूण 705 आणि पुणे 1, सोलापूर 3, मुंबई 1, कर्नाटक 2 आणि आंध्रप्रदेश 1 असे इतर जिल्हा व राज्यातील मिळून 8 अशा एकूण 713 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे. जिल्ह्यातील एकूण 713 रूग्णांपैकी 616 रूग्णांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण 8 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 89 इतकी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details