कोल्हापूरकरांचा नादच खुळा... धावण्याची स्पर्धा जिंकल्याच्या आनंदात केला हवेत गोळीबार - Kolhapur Police News
भाचा जिंकल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी हवेत गोळीबार केल्याची घटना कोल्हापुरात समोर आली आहे. या गोळीबारानंतर कोल्हापूर पोलीस काय करावाई करणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
भाच्याने धावण्याची स्पर्धा जिंकल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी हवेत गोळीबार
कोल्हापूर - शहरात आनंद व्यक करण्यासाठी हेवेत गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. भाच्याने धावण्याची स्पर्धा जिंकल्याचा आनंद भर वस्तीमध्ये दिवसा हवेत गोळीबार करून साजरा केला. या वेळी संबधीत व्यक्तीने ४ वेळा हवेत गोळी बार केला. भीती पोटी परिसरातील नागरिकांनी घराचे दरवाजे बंद करून घेतले. हवेत गोळीबार करणाऱ्यावर कोल्हापूर पोलीस कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Last Updated : Feb 11, 2020, 3:21 PM IST