कोल्हापूर - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल (सोमवार) संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. कृषी क्षेत्रासाठी सुद्धा काही घोषणा करण्यात आल्या. यासंदर्भातच कोल्हापुरातील शेतकऱ्यांच्या नेमक्या काय अपेक्षा होत्या आणि शेतकरी कितपत समाधानी आहेत, याबाबत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला...
अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या हाती निराशा; पहा काय म्हणाले कोल्हापुरातील शेतकरी
सोमवारी दशकातील पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला सलग तिसरा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात आरोग्य, सार्वजनिक वाहतूक, रेल्वे, शहरांचा विस्तार यावर भरीव तरदूत करण्यात आली आहे. मात्र, कृषी शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
कोल्हापूर
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. एकीकडे नव्या कृषी कायद्यांबाबत दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. याच पार्श्वभूमीवर निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी वचनबद्ध असून शेतमालाला दीडपट हमीभाव देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले होते.