कोल्हापूर -कृषी मूल्य आयोग एफआरपी ठरवताना सरकारची सोय बघून ठरवते की उत्पादन खर्च पाहून हे अगोदर स्पष्ट करावे. ऊस उत्पादक शेतकर्यांच्या पदरात काहीच पडत नाही, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. कृषी मूल्य आयोगाने उसाच्या एफआरपीमध्ये 50 रूपयांची वाढ केली आहे. त्यावर बोलताना राजू शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
एफआरपी सरकारची सोय बघून ठरवतात की उत्पादन खर्च पाहून? - राजू शेट्टी - कृषी मूल्य आयोग
उसाची एफआरपी केवळ 2900 रूपये आहे. पेट्रोल व डिझेल 22 ते 24 रूपये प्रतिलिटर एका वर्षात वाढले आहे. उसाचा दर मात्र केवळ 50 रूपये केले आहे. आमचा खर्च किती व पदरात किती पडणार हाच प्रश्न शेतकर्यांच्या पुढे आहे.
याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, याच कृषी मूल्य आयोगाने सन 2012 साली केंद्र सरकारला 1700 रूपये एफआरपी सुचवली होती. त्यावेळी डिझेल 46 रूपये प्रतिलिटर दर होता. आज 98 रूपये म्हणजेच दुपट्टीपेक्षा जास्त डिझेलची किंमत झालेली आहे. उसाची एफआरपी केवळ 2900 रूपये आहे. पेट्रोल व डिझेल 22 ते 24 रूपये प्रतिलिटर एका वर्षात वाढले आहे. उसाचा दर मात्र केवळ 50 रूपये केले आहे. आमचा खर्च किती व पदरात किती पडणार हाच प्रश्न शेतकर्यांच्या पुढे आहे. केवळ राजकीय सोयीसाठी कृषीमूल्य आयोग उसाची एफआरपी कमी ठरवत आहे. मात्र यामध्ये शेतकरी भरडला जात आहे. या कृषी मूल्य आयोगाला जाग येणार कधी व शेतकर्यांना न्याय मिळणार कधी. वास्तवमधील उत्पादन खर्च मान्य झाल्याशिवाय शेतकर्यांना काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे 50 रूपयांची वाढ ही केवळ तुटपुंजी वाढ असल्याची प्रतिक्रिया सुद्धा शेट्टी यांनी व्यक्त केली.
हेही वाचा-राहुल गांधींना मालमत्तांचे रोखीकरण समजते का? निर्मला सीतारामन यांचा राहुल गांधींना खोचक टोला