कोल्हापूर - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाच मास्कचा विसर पडल्याचे आज पाहायला मिळाले. कोल्हापूरातील एका कार्यक्रम ठिकाणी राजेश टोपे मास्कविना दिसले असून व्यासपीठावरील एकानेही मास्क घातला नसल्याचे पाहायला मिळाले. (forgot the mask Event at Kolhapur) एकीकडे अजूनही राज्यभरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. (Rajesh Topen, forgot the mask) अजूनही कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध आहेत असे असताना आरोग्यमंत्रीच मास्कविना दिसले आहेत.
व्यासपीठावर चार आमदार; एकानेही मास्क घातला नाही
कोल्हापूरातील एका हॉस्पिटलमध्ये आयोजित कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे आज आले आहेत. या कार्यक्रमात अनेक आमदार तसेच मान्यवर उपस्थित आहेत. यामध्ये आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेश पाटील, आमदार जयंत पाटील आसगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत मात्र एकानेही मास्क घातला नाही त्यामुळे सर्वांनाच मास्कचा विसर पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, व्यसपीठाखाली उपस्थित सर्वच नागरिकांनी मात्र न विसरता मास्क घातला आहे.
हेही वाचा - माझी अन् दानवेंची बरोबरी होत नाही; मी राज्यातील 13 प्रमुख नेत्यांपैकी एक -खैरे