कोल्हापूर - लष्कर, एनडीआरएफ, नौदल, जिल्हा प्रशासन, एसडीआरएफ, लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक हे सगळेच मिळेल त्या साधनाने अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीला धावले आहेत. कोणी तराफ्यावरून, दोरीच्या सहाय्याने, प्लास्टिक खुर्चीच्या मदतीने तर कोणी प्लास्टिक बॅरेलच्या साहाय्याने पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी पोहोचवत आहेत.
काही ठिकाणी प्लास्टिक खुर्च्यांच्या माध्यमातून वृध्दांना पाण्यातून बाहेर काढले आहे. टाकवडे गावातील 'आधार रेस्क्यू फोर्स'ने ग्रामस्थांच्या मदतीने शिरोळ तालुक्यातील शिरढोण येथील पूरग्रस्तांना तराफ्यावरून बाहेर काढले आहे. तसेच या तालुक्यातील कुरूंदवाड, बहिरेवाडी येथे एनडीआरएफचे पथक पूरग्रस्तांना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढत आहे. भुदरगड तालुक्यातील मडुर, वासनोली, पाळ्याचा हुडा, चोपडेवाडी येथील चार गरोदर महिलांना यांत्रिक बोटीद्वारे ग्रामीण रूग्णालयात सुखरूप दाखल करण्यात आले.
हातकणंगले तालुक्यातील निलेवाडीत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत रेस्क्यू यंत्रणा पार पाडावी लागली. हातकणंगले तालुक्यातील निलेवाडीत अतिशय प्रतिकूल परिस्थितीत रेस्क्यू यंत्रणा पार पाडावी लागली. मंडल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक कर्मचाऱ्यांनी गावात थांबून दोरीच्या साहाय्याने पूरग्रस्तांची सुटका केली. राज्य परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्लास्टिकचे बॅरेल आणि बांबूपासून तराफा बनवून स्थानिक तरूणांच्या सहकार्याने पूरग्रस्तांची सुटका केली. तसेच काही ठिकाणी प्लास्टिक खुर्च्यांच्या माध्यमातून वृध्दांना पाण्यातून बाहेर काढले आहे. आंबेवाडीमध्ये अडकलेल्या लोकांना चेअर नॉटच्या मदतीने दुसऱ्या मजल्यावरून आपत्ती व्यवस्थापकांनी सोडवले.
भुदरगड तालुक्यातील मडुर, वासनोली, पाळ्याचा हुडा, चोपडेवाडी येथील चार गरोदर महिलांना यांत्रिक बोटीद्वारे ग्रामीण रूग्णालयात सुखरूप दाखल करण्यात आले. शहरातील विविध ठिकाणच्या शिबीरांमध्ये पूरग्रस्तांसाठी भोजन, निवास आदीची सोय सेवाभावी संस्थांनी केली आहे. यामध्ये शिरोली मधील मदरसाही सहभागी झाला आहे. सोशल मीडिया वरूनही विविध सेवाभावी संस्था आणि युवक मंडळांनी, पत्रकारांनी मदतीबाबत आपला सहभाग नोंदवला आहे. चादरी, भोजन, पाणी, औषधे,इ मदत देण्याबाबत विविध संपर्क क्रमांकांच्या पोस्ट व्हायरल केल्या आहेत. जिल्ह्यातील या नैसर्गिक आपत्तीत सर्वच यंत्रणांनी जमेल त्या मार्गाने आपला सहभाग नोंदवला आहे.