मुंबई- एकीकडे विधानसभेच्या उमेदवारीसाठी देव पाण्यात ठेवलेले उमेदवार असताना कोल्हापूरमधील एक पठ्ठ्या असा आहे ज्याला दोन पक्षांनी उमेदवारी दिली आहे. कोल्हापूर येथील डॉ आनंद गुरव यांना करवीर या मतदारसंघातुन आम आदमी पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर लगेच वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा गुरव यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे विजयाच्या आधीच गुरव यांची चर्चा होत आहे.
ऐकावे ते नवलच...एकाच वेळी दोन पक्षातून उमेदवारी - election latest news
कोल्हापूर येथील डॉ आनंद गुरव यांना करवीर या मतदारसंघातुन आम आदमी पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर लगेच वंचित बहुजन आघाडीनेसुद्धा गुरव यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे विजयाच्या आधीच गुरव यांची चर्चा होत आहे.
हेही वाचा - पवारांना ईडीची नोटीस; संतापलेल्या राष्ट्रवादीकडून आज बारामती बंद, पुण्यात निदर्शने करणार
गुरव यांनी मात्र वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणार, असे जाहीर केले आहे. त्याबरोबर वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टीची चर्चा सुरू आहे. जर ही चर्चा यशस्वी झाली तर माझ्यापेक्षा आनंदी कोणी नाही. वंचित बहुजन पक्षाने दाखवलेला विश्वास मी नक्की साध्य करून दाखवेन, त्याचबरोबर माझ्या मतदारसंघात असलेली घराणेशाहीसुद्धा मोडून काढेन, असे गुरव यांनी सांगितले.