कोल्हापूर- आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज भरताना आपण आमदार सतेज पाटील यांना निमंत्रण देणार आहोत. मात्र, यायचे की नाही, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे, असे आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी म्हटले आहे. आज कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील आघाडीच्या नेत्यांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
सतेज पाटलांना निमंत्रण देणार, यायचं की नाही त्यांचा निर्णय - धनंजय महाडिक
आघाडीच्या वतीने उमेदवारी अर्ज भरताना आपण आमदार सतेज पाटील यांना निमंत्रण देणार आहोत. मात्र, यायचे की नाही, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे, असे आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी म्हटले आहे.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते. कोल्हापूरमध्ये सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. परंतु, या वादाचा फटका खासदार महाडिक यांना निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मी आघाडी धर्म पाळून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सतेज पाटील यांना आमंत्रण देणार असल्याचे खासदार महाडिक यांनी म्हटले आहे. येत्या २ तारखेला शरद पवार कोल्हापुरात येणार आहेत. ते कोल्हापुरात येऊन 'बंटी' आणि 'मुन्ना' यांच्यामध्ये समेट घडवणार का? याकडेच सगळ्याचे लक्ष लागले आहे.