महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोविड सेंटरमधील कचरा उचलण्यासाठी कोल्हापूर महापालिकेकडून दिरंगाई - कोल्हापूर कोविड सेंटर कचरा न्यूज

वारंवार फोन करून देखील कचरा उचलण्यास कोणी येत नाही. त्यामुळे कोविड सेंटर चालकदेखील भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. तसेच नागरिकांच्या आरोग्यालादेखील धोका निर्माण निर्माण होऊ शकतो. त्याला जबाबदार कोण, असा सवाल कोविड सेंटर चालकांनी केला आहे.

kolhapur
कोल्हापूर

By

Published : Apr 30, 2021, 3:46 PM IST

Updated : Apr 30, 2021, 4:37 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेकडून कोविड सेंटरमधील कचरा उचलण्यास दिरंगाई होत आहे. वारंवार फोन करून देखील कचरा उचलण्यास कोणी येत नाही. त्यामुळे कोविड सेंटर चालकदेखील भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. तसेच नागरिकांच्या आरोग्यालादेखील धोका निर्माण निर्माण होऊ शकतो. त्याला जबाबदार कोण, असा सवाल कोविड सेंटर चालकांनी केला आहे.

कोविड सेंटरमधील कचरा उचलण्यासाठी कोल्हापूर महापालिकेकडून दिरंगाई
कोल्हापूर महानगरपालिकेकडून कोल्हापूर शहरातील सरकारी, खासगी हॉस्पिटलसह नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमधील कचरा उचलण्याचे काम केले जाते. दररोज एक टन कचरा जमा होतो. तर नॉन कोविड कचरा एक टन जमा होतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून या यंत्रणेवर ताण आला आहे. पण, वारंवार फोन करून देखील कोल्हापूर महानगरपालिका कचरा उचलण्यास दोन दिवसांपासून आली नाही, असे कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी सांगितले. तर दुसरीकडे ऑपरेटर यंत्रणेवर कोणताच ताण नसल्याचे सांगत आहेत. राजारामपुरी परिसरातील एका कोविड सेंटरमधून या यंत्रणेला गेल्या चोवीस तासापासून पाच ते सात वेळा संपर्क केला. तरीदेखील कचरा उचलायला कोणी आले नाही. त्यामुळे डॉक्टर, कर्मचारी आणि नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत, असे मानसेवा कोविड सेंटरमधील डॉ. प्रवीण कारंडे यांनी सांगितले आहे.
Last Updated : Apr 30, 2021, 4:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details