कोल्हापूर- इचलकरंजी शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नसोहळ्यात चक्क नवरी मुलगीच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. मात्र, यानंतरही लग्न सोहळा सुरूच ठेवण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच इचलकरंजी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने कारवाई करत शिवजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इचलकरंजीत कोरोना पॉझिटिव्ह मुलीचा विवाह सोहळा; शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल - इचलकरंजीत कोरोना पॉझिटिव्ह मुलीचा विवाह सोहळा
राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी ही नियमावली पायदळी तुडविण्यात आल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील धक्कादायक घटना
राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मात्र, अनेक ठिकाणी ही नियमावली पायदळी तुडविण्यात आल्याचे चित्र आहे. असाच प्रकार कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये घडला आहे. शहरात आयोजित करण्यात आलेल्या लग्न सोहळ्यात चक्क नवरी मुलगीच पॉझिटिव्ह निघाली आहे. तरीही हा सोहळा सुरूच ठेवण्यात आला होता. एवढचं नाही तर या लग्न सोहळ्यात ५० पेक्षा अधिक लोक उपस्थित होते. पालिकेने संबंधितांवर कारवाई केली असून याबाबत शिवाजीनगर पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या धक्कादायक घटनेची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.