कोल्हापूर- पंतप्रधान मोदींच्या 'मै भी चौकीदार हूं' या गाण्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या गाण्याच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करण्यात आले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
'मै भी चौकीदार हूं' या गाण्यावर काँग्रेसचा आक्षेप, आचारसंहिता भंगची पहिली तक्रार कोल्हापुरात दाखल - तक्रार
निवडणूक आयोगाकडे देशातील पहिली तक्रार कोल्हापुरातून दाखल झाली आहे.
मोदींच्या 'मै भी चौकीदार हूं' या गाण्यावर काँग्रेसने घेतला आक्षेप
त्यामुळे यासंदर्भात चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव तौफिक मुलाणी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची देशातील ही पहिली तक्रार कोल्हापुरातून दाखल करण्यात आली आहे.