महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत राडा

गोकुळ दूध संघाच्या 57 व्या सर्वसाधारण सभेत राडा झाला आहे. ही सभा आज (बुधवारी) ताराबाई पार्कच्या कार्यालयाच्या पटांगणात सभा पार पडत आहे. मात्र, या सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चक्क खुर्च्या बांधून ठेवण्याची वेळ सत्ताधारी गटावर आली आहे. तरीही सभेत गोंधळ घालण्यात आला आहे.

कोल्हापुरात गोकुळ दुध संघाच्या सर्वसाधारण सभेत राडा

By

Published : Oct 30, 2019, 11:57 AM IST

Updated : Oct 30, 2019, 5:02 PM IST

कोल्हापूर - गोकुळ दूध संघाच्या 57 व्या सर्वसाधारण सभेत राडा झाला आहे. ही सभा आज (बुधवारी) ताराबाई पार्कच्या कार्यालयाच्या पटांगणात सभा पार पडत आहे. मात्र, या सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चक्क खुर्च्या बांधून ठेवण्याची वेळ सत्ताधारी गटावर आली आहे. तरीही सभेत गोंधळ घालण्यात आला आहे.

कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत राडा

गोकुळची सभा म्हटले की, दरवर्षी गोंधळ ठरलेलाच असतो. त्यामुळे पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. सभेमध्ये मल्टीस्टेटच्या मुद्द्यावरून यावर्षी सुद्धा वाद होण्याची दाट शक्यता होती. मात्र, सभेपूर्वीच गोकुळच्या अध्यक्षांनी मल्टीस्टेटचा प्रस्ताव रद्द केला. असे अनेक प्रश्न आहेत ज्यामुळे या सभेत सुद्धा वाद होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून सर्वांचे या सभेकडे लक्ष लागले होते. मात्र, सभेत सतेज पाटील यांच्या विरोधी गटाकडून मोठा गोंधळ घालण्यात आला. यात कार्यकर्त्यांनी विविध प्रस्तावाविरुद्ध घोषणा दिल्या आहेत.

नेहमीप्रमाणेच यंदाच्या सभेतही राडा झाला आहे. मल्टीस्टेटच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गोंधळ घातला. मल्टीस्टेटच्या मुद्द्यांबरोबरच असे अनेक प्रश्न आहेत ज्या मुळे या सभेत पुन्हा गोंधळ झाला. विशेष म्हणजे यावर्षीच्या सभेत सभासदांना बोलण्यासाठी माईकच दिला नसल्याने विरोधकांनी मोठ्या प्रमाणात याठिकाणी गोंधळ घातला.


सभेपुढचे विषय -

1 - चालू वर्षिच्या सर्वसाधारण सभेच्या नोटीसचे वाचन करणे आणि मागील वर्षीच्या सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे.

2 - 31 मार्च 2019 अखेर संपणाऱ्या आर्थिक वर्षाचा संघाच्या कार्याचा संचालक मंडळाच्या वतीने सादर केलेला अहवाल, ताळेबंद, नफा-तोटा आणि व्यापारी पत्रकारास मंजुरी देणे.

3 - संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन 2018-19 या आर्थिक वर्षाच्या नफा विभागनीस मंजुरी देणे.

4 - सण 2018-19 सालच्या अंदाजपत्रकापेक्षा जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे.

5 - सण 2019-20 सालच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे.

6 - सण 2017-18 या मदतीचा वैधानिक लेखापरीक्षक कोल्हापूर यांच्याकडे आलेला लेखापरीक्षण अहवाल दोष दुरुस्ती करून खात्यात पाठवला आहे त्याची नोंद घेणे.

7 - सण 2018-19 मुदतीचा वैधानिक लेखापरीक्षक कोल्हापूर यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करणे.

8 - 2019-20 या आर्थिक वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षक यांची नियुक्ती करणे.

9 - अध्यक्ष यांच्या अनुमतीने ऐनवेळी येणार्‍या विषयांचा विचार करणे

Last Updated : Oct 30, 2019, 5:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details