महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Investment Fraud in Sangali : इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात शिवप्रतिष्ठान युवाची तक्रार

Investment Fraud in Sangali शेअर मार्केट, इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानकडून थेट ईडीकडे तक्रार करण्यात आली आहे. सुमारे 3 हजार कोटींचा घोटाळा ( 3 thousand crore scam ) शेअर मार्केट, इन्व्हेस्टमेंट कंपन्यांंनी केला आहे. त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

shivpratishthan
शिवप्रतिष्ठान युवा

By

Published : Sep 24, 2022, 4:23 PM IST

सांगली - Investment Fraud in Sangali शेअर मार्केट, इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ( Fraud of crores in the name of investment ) कंपन्यांविरोधात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानकडून थेट ईडीकडे तक्रार करण्यात आली आहे. सुमारे 3 हजार कोटींचा घोटाळा ( 3 thousand crore scam ) शेअर मार्केट, इन्व्हेस्टमेंट कंपन्यांंनी केला आहे. त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे ( Shiv Pratishthan Yuva Hindustan ) संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

गुंतवणूकीच्या नावाखाली अधिक परतावा - महाराष्ट्रात शेअर मार्केट आणि ऑनलाईन ट्रेडिंग व गुंतवणूकीच्या नावाखाली अधिक परतावा ( More returns in the name of investment ) देण्याचे आमिष दाखवून सर्वसामान्य गोरगरिबांचे कोट्यवधी रुपयांची फसवणूक कण्याचे प्रकार समोर आले आहेत. याप्रकरणी सांगली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तक्रारी दाखल झाली ( Complaint to ED against cheating companies ) आहे. काही कंपन्यांच्या संचालकांना अटक देखील करण्यात आली आहे.

शिवप्रतिष्ठान युवा

चौकशीची मागणी - या सर्व पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानकडून आता या शेअर मार्केट,इन्व्हेस्टमेंट कंपन्यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली ( Share market and investment companies ) आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बारा कंपन्यांच्या मध्ये सुमारे 3000 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करत, त्याची सखोल चौकशी करावी,अशी मागणी ईडी कडे करण्यात आल्याचे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी दिली आहे. त्याचबरोबर ज्या लोकांची फसवणूक झाली आहे. त्यांनी पुढे येऊन या कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल कराव्यात असा आवाहन देखील चौगुले यांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details