कोल्हापूर -आगामी विधानसभा निवडणूकीत आचारसंहिता काटेकोरपणे पाळली जावी, यासाठी पूर्ण दक्षता घेण्यात येईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघ आहेत यासाठी प्रशासकीय स्तरावर निवडणूक यंत्रणा सक्षमपणे सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
आचारसंहिता काटेकोरपणे पाळली जाईल - जिल्हाधिकारी - Kolhapur district collector PC
आगामी विधानसभा निवडणूकीत आचारसंहिता काटेकोरपणे पाळली जावी, यासाठी पूर्ण दक्षता घेण्यात येईल, असे जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात दहा विधानसभा मतदारसंघ आहेत यासाठी प्रशासकीय स्तरावर निवडणूक यंत्रणा सक्षमपणे सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा -विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा राज ठाकरेंना कार्टूनमधून चिमटा!
जिल्ह्यात कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कागल, राधानगरी, चंदगड, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ आणि शाहूवाडी या दहा विधानसभा मतदारसंघात निवडणुका होत आहे. त्याकरिता प्रशासकीय तसेच कायदा-सुव्यवस्था राबविण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे देसाई यांनी सांगितले आहे. पुढे ते म्हणाले, निवडणुकीची अधिसूचना 27 सप्टेंबर रोजी जारी होणार आहे. तर 4 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 5 ऑक्टोबर रोजी (दाखल झालेल्या) उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तर माघारीची अंतिम तारीख 7 ऑक्टोबर आहे. 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमधील मतदारांनी आपली नावे तपासावीत आणि आपल्या नावाची शहानिशा करून आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन देसाई यांनी केले आहे.