कोल्हापूर -लॉकडाऊन काळातील वीज बिल थकवणाऱ्या वीज ग्राहकांना महावितरण शॉक देणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल १४ लाख २९ हजार ८११ ग्राहकांना याचा जोराचा झटका बसणार आहे. येत्या चौदा दिवसात वीज बिल थकवणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करावा, अशा सूचना पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिल्या आहेत.
कोल्हापूर : महावितरणच्या 'शॉक'ला कोल्हापुरी पायतान भारी पडणार का? - कोल्हापूर नागरी कृती समिती न्यूज
पश्चिम महाराष्ट्रातून तब्बल १ हजार ९६२ कोटी २७ लाखांची थकबाकी असून कोल्हापूर विभागीय कार्यक्षेत्रातून तब्बल ५२८ कोटींची वीज बिल थकीत आहे. यापूर्वीच कोल्हापुरात वीज बिल विरोधात आंदोलन सुरू आहे. वीज बिल मागणाऱ्याला कोल्हापुरी पायतान दिले जाईल, असे फलक झळकवण्यात आले आहेत. त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे संघर्षाला धार निर्माण झाल्याचे चित्र आहे.
पश्चिम महाराष्ट्रातून तब्बल १ हजार ९६२ कोटी २७ लाखांची थकबाकी असून कोल्हापूर विभागीय कार्यक्षेत्रातून तब्बल ५२८ कोटींची वीज बिल थकीत आहे. यापूर्वीच कोल्हापुरात वीज बिल विरोधात आंदोलन सुरू आहे. वीज बिल मागणाऱ्याला कोल्हापुरी पायतान दिले जाईल, असे फलक झळकवण्यात आले आहेत. त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशामुळे संघर्षाला धार निर्माण झाल्याचे चित्र आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये वीज बिलांच्या थकबाकीसह इतर मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक घेण्यात आली. या बैठकीत नाळे यांनी वरील आदेश दिले. यावेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्यासह पाचही जिल्ह्यातील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रादेशिक संचालक नाळे म्हणाले, 'सद्यस्थितीत पुणे (1032.80कोटी), सातारा (140,36 कोटी), सोलापूर (259,12 कोटी), सांगली (192.54 कोटी) व कोल्हापूर (337,43 कोटी) या जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे एकूण 1 हजार 962 कोटी 27 लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी 1 हजार 247 कोटी 49 लाख रुपयांची थकबाकी असणाऱ्या 14 लाख 29 हजार 811 वीज ग्राहकांनी गेल्या 1 एप्रिल 2020 पासून एकाही महिन्याचे वीज बिल भरलेले नाही. महावितरणकडून वारंवार प्रत्यक्ष संपर्क साधून देखील ग्राहकांनी थकबाकीचा भरणा केलेला नाही. त्यामुळे नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल.'
महावितरणवर मोठे आर्थिक संकट आले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी वीज ग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करणे आवश्यक आहे. ज्या ग्राहकांना आवश्यकता आहे, अशा ग्राहकांना वीज बील भरण्यासाठी देखील सोय करण्यात आलेली आहे. तसेच हप्त्याने वीज बिल भरण्याची सोय देखील करण्यात आली आहे. मात्र तरीदेखील अनेक ग्राहकांनी वीज बिल थकीत ठेवली आहेत. अशा ग्राहकांची येत्या चौदा दिवसांत वीज पुरवठा खंडित केला जाईल, असा आदेश दिला आहे.
मोठा संघर्ष उफाळण्याची शक्यता
लॉकडाऊन काळातील एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीतील वीज बिल माफ व्हावीत यासाठी कोल्हापूर नागरी शहर व नागरी कृती समितीने आंदोलन पुकारले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व भाजप पक्षाने वीज बिल माफ करण्याची मागणी केली आहे. वीज पुरवठा खंडित केलास गाठ आमच्याशी आहे, असा इशारा राज्य सरकारला या तिन्ही संघटनांनी दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार-महावितरण विरुद्ध कोल्हापूर जनता असा संघर्ष पुन्हा एकदा उफळण्याची शक्यता आहे.