कोल्हापूर- गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारावे तसेच मराठ्यांच्या इतिहासासंबंधित दस्तावेज, पत्रव्यवहार किंव्हा तत्सम ग्रंथ रायगड विकास प्राधिकरणास मिळावे, यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. निवेदनाद्वारे प्रमोद सावंत यांच्याकडे आपण ही मागणी केली असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले आहे.
गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारावे - संभाजीराजे छत्रपती
संभाजीराजे यावेळी म्हणाले, 'रायगड विकास प्राधिकरणाला, गोवा सरकारने पोर्तुगीज कागदपत्रे, पत्रव्यवहार आणि संदर्भ ग्रंथ याबाबत सहकार्य करण्याची गरज आहे. गोव्याचे पोर्तुगीज आणि मराठा सत्तांमध्ये नेहमी संघर्ष राहिला होता.
संभाजीराजे यावेळी म्हणाले, 'रायगड विकास प्राधिकरणाला, गोवा सरकारने पोर्तुगीज कागदपत्रे, पत्रव्यवहार आणि संदर्भ ग्रंथ याबाबत सहकार्य करण्याची गरज आहे. गोव्याचे पोर्तुगीज आणि मराठा सत्तांमध्ये नेहमी संघर्ष राहिला होता. व्यापारी संबंध देखील होते. त्यामुळे अनेक पत्रव्यवहार झाले होते. त्यातून रायगड संबंधातील काही नोंदी सापडतील का? हे सुद्धा समजणार आहे. शिवाय तसे थेट पुरावे सापडले तर, रायगड संवर्धन कार्यात त्याचा उपयोग होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी गोव्याच्या पोर्तुगीजांना नियंत्रणात ठेवले होते. त्यामुळे दोन्ही सत्तांमध्ये बरीच देवाण-घेवाण झाली असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले असून गोव्यामध्ये मराठ्यांनी जो उज्वल इतिहास घडवला तो सर्वांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
शिवरायांचे विधानसभा, मंत्रालय आणि मुख्यमंत्री कार्यालयात पोट्रेट लावावे - संभाजीराजे
यावेळी संभाजीराजेंनी गोव्याच्या विधानसभेत, मंत्रालय तसेच मुख्यमंत्री कार्यालयात सुद्धा शिवाजी महाराजांचे मोठे पोस्टर लावावे, अशी मागणी केली. शिवाय यासाठी मुख्यमंत्री सावंत यांनी स्वतः पुढाकार घ्यावा, अशीही मागणी करत ही आपल्यासह शिवभक्तांसाठी मोठी भेट असेल असेही म्हटले आहे.
TAGGED:
कोल्हापूर बातम्या