महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Khashaba Jadhav : गूगलने दखल घेतली पण सरकारने नाही! जागे व्हावे, खाशाबा जाधवांना उचित सन्मान द्या; संभाजीराजे

भारताला 1992 साली पहिले ऑलिम्पिक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त सर्च इंजिन नुकतेच एक खास डूडल तयार केले आहे. कुस्तीगीर खाशाबा जाधव यांची आज 97 वी जयंतीदिनी गूगलने खास डूडल तयार करून खाशाबा जाधवांना अभिवादन केले आहे. यादरम्यान, पैलवान खाशाबा जाधव यांच्या कार्याला उचित सन्मान देऊन अभिवादन करण्यासाठी सरकार केव्हा जागे होणार, असा प्रश्न छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला विचारला आहे.

Google doodle
खाशाबा जाधव गूगल डूडल

By

Published : Jan 15, 2023, 5:07 PM IST

कोल्हापूर :१९५२ साली भारताला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव यांची आज जयंती. त्यांच्या जयंती निमित्त गूगलने खास डूडल तयार करून त्यांना अभिवादन केले आहे. मात्र त्यांच्या कार्याला उचित सन्मान देऊन अभिवादन करण्यासाठी सरकार केव्हा जागे होणार, हाच प्रश्न आहे ! असे म्हणत संभाजीराजे यांनी उद्विग्न भावनेतून फेसबुक पोस्ट केली आहे.

पद्म पुरस्कारापासून वंचित : संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून सांगितले की, देशासाठी ऑलिम्पिक पदक मिळविणाऱ्या खेळाडूस सरकारकडून "पद्म" पुरस्काराने सन्मानित केले जाते. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. मात्र ज्यांनी देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले ते पैलवान खाशाबा जाधव अजूनही पद्म पुरस्कारापासून वंचित आहेत. आपण खासदार असताना २०१७ ते २०२२ अशी सहा वर्षे सलग, खाशाबांना मरणोत्तर "पद्मविभूषण" मिळावा, यासाठी केंद्रात सर्व पातळीवर वारंवार पाठपुरावा केला होता, मात्र शेवटी उपेक्षाच झाली. संभाजीराजेंनी खाशाबा जाधवांबद्दलच्या भावना आपल्या पोस्टमधून मांडल्या आहेत.

आता तरी जागे व्हा : आता तरी सरकारने जागे व्हावे, असे म्हणत या महान मल्लावर ऑलिम्पिकच्या मैदानातही अन्याय झाला होता. तरीदेखील देशासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिद्दीने जिंकून आणणाऱ्या खाशाबा जाधव यांना "पद्म" पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा उचित गौरव करणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असे मत सुद्धा संभाजीराजेंनी व्यक्त केले आहे.

भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक : भारताला स्वातंत्र्योत्तर काळात पहिले वैयक्तिक पदक मिळवून देण्यात पैलवान खाशाबा जाधव यांचे नाव घेतले जाते. 1952 साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी फ्रीस्टाइल कुस्तीत कांस्यपदक जिंकले. तत्पूर्वी 1948 मध्ये जेव्हा लंडन ऑलिंपिकसाठी फ्लायवेट गटासाठी खाशाबांची निवड झाली तेव्हा ते सहाव्या क्रमांकावर होते. या क्रमांकापर्यंत पोहचणारे भारत देशातील ते एकमेव खेळाडू होते.

पैलवान खाशाबा जाधवांचा कारकिर्द : पैलवान खाशाबा जाधव यांनी 1952 साली ऑलिम्पिक पदक प्राप्त केल्यानंतर 1955 मध्ये खाशाबा जाधव हे महाराष्ट्र पोलीस दलात ते पोलिस उपनिरीक्षक पदावर भरती झाले. तेथे आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या. त्याचवेळी ते राष्ट्रीय पातळीवर स्पोर्ट्‌स मार्गदर्शक म्हणून काम करू लागले. हे करत असतानाच त्यांनी पोलीस खात्यात 27 वर्षे नोकरी केली आणि सहायक पोलिस आयुक्त या पदावरून निवृत्त झाले. 1984 मध्ये एका अपघातात खाशाबा जाधव यांचे निधन झाले. 2001 मध्ये त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

हेही वाचा :NCC Cadet Akanksha Asanare : आकाशाला गवसणी घालणाऱ्या 'आकांक्षाची' साता समुद्रापार नेत्र दीपक कामगिरी

ABOUT THE AUTHOR

...view details