कोल्हापूर - महाराष्ट्रातील मोठ-मोठी राजकीय घराणी भाजपच्या संपर्कात आहेत. रोज एक-एक घराणे भाजपसोबत येईल. तसेच येत्या २ दिवसात उत्तर महाराष्ट्रातील काही नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
बाळासाहेब ठाकरे युतीच्या प्रचाराचा शुभारंभ नेहमी कोल्हापुरातून करायचे. यावेळी उद्धव ठाकरे यांनीही युतीचा प्रचार कोल्हापुरातून सुरू करावा, अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यासाठी येत्या २४ तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.