कोल्हापूर- काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय वायू दलाने पाकिस्तानमधील दहशतवादी केंद्र नेस्तनाबूत केली. याचा आनंद देशभर व्यक्त केला जात आहे. कोल्हापुरातील सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांनी भारतीय सैन्याचे अभिनंदन करून आनंद साजरा केला.
सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांनीही व्यक्त केल्या आपल्या भावना - वाचा सविस्तर - कोल्हापूर
कोल्हापुरातील सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांनी भारतीय सैन्याचे अभिनंदन करून आनंद साजरा केला.
भारतीय वायू दलाने पाकिस्तानमधील दहशतवादी केंद्र नेस्तनाबूत केली. दरम्याना या दिवशी कोल्हापूरमध्ये सैन्य भरती सुरू आहे. या ठिकाणी १६० जागांसाठी देशातील कानाकोपऱ्यातून तरुण भरतीसाठी आले आहेत. एकीकडे सीमेवर केंव्हाही युद्ध होईल, अशी तानावपूर्ण परिस्थिती आहे. दिल्ली, मुंबईसह पाच मोठ्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे, असे असतानाही कोल्हापुरातील सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांची गर्दी देशाप्रती असलेले प्रेम दाखवून देते.
यावेळी सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यांना भारताने, अशाच पद्धतीने उत्तरे द्यायला हवीत. पाकिस्तानमध्ये घुसून भारताने केलेली ही कारवाई योग्यच आहे. शिवाय जेवढा मोठा हल्ला ते करतील त्यापेक्षा मोठा हल्ला करण्याची वेळ आल्याच्या प्रतिक्रियाही यावेळी सैन्य भरतीसाठी आलेल्या तरुणांनी व्यक्त केल्या.