महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 28, 2020, 6:37 PM IST

ETV Bharat / state

शेतमजूर महिलांनी समरजितसिंह घाटगे यांच्यासमोर मांडली गाऱ्हाणी

समरजित घाटगे यांनी संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी जिल्हा दौऱ्याची सुरुवात केली आहे. गेल्या 20 ते 25 दिवसात त्यांनी अनेक गावांना भेट देत तिथल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. आता त्यांच्या हातकणंगले दौऱ्यामध्ये सुद्धा अनेक शेतकरी महिलांनी समरजित घाटगे यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या.

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर- सरकार एकदा म्हणतंय वीज बिल माफ करतो, एकदा म्हणत आहे वीज बिलात सवलत देतो, आता तेच सरकार म्हणत आहे वीज बिलं भरा. मोठ्या-मोठ्यांची कर्जमाफी झाली, कोरोनामुळे गरिबांचा रोजगार बुडाला आहे. आम्ही वाढीव वीज बिले कशातून भरावयाची? ऊसाची भरणी करावी, ऊस भांगलावे? की वाढीव विजबिले भरावीत. एवढेही न कळणारे हे सरकार आहे काय? असा सवाल हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथील शेतमजूर महिलांनी शाहू कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यासमोर उपस्थित केला. शिवाय त्यांनी त्यांच्यी गाऱ्हाणी मांडली.

रांगोळी, ता. हातकणंगले

गेल्या महिन्याभरात अनेक गावांना समरजित घाटगेंची भेट -

समरजित घाटगे यांनी संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी जिल्हा दौऱ्याची सुरुवात केली आहे. गेल्या 20 ते 25 दिवसात त्यांनी अनेक गावांना भेट देत तिथल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. आता त्यांच्या हातकणंगले दौऱ्यामध्ये सुद्धा अनेक शेतकरी महिलांनी समरजित घाटगे यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याची जनपंचायत शिवार संवाद कार्यक्रमानंतर समरजित घाटगे रांगोळी गावातील दादासो पाटील यांच्या शेत मळ्यात त्यांची शंभर वर्षांपूर्वीची मोटेवरील विहीर पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी बाजूच्या शेतात ऊस भांगलन करीत असलेल्या महिलांशी त्यांनी संवाद साधला यावेळी काही महिलांनी आपल्या व्यथा बोलून दाखवत त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली.

शेतकऱ्यांवर अनेक अडचणी त्यात वाढीव वीजबिल कसे भरावे?

लॉकडाऊन काळात रोजगार बुडाला आहे. आम्हा मजुरांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. इथे दररोजच्या रोजी रोटीचा प्रश्न उभा आहे? आणि सरकार म्हणतंय वीज बिले भरा. भरमसाठ दराने वाढून आलेली वीज बिले आम्ही भरायची तरी कशी? पशुखाद्याचे दर वाढले आहेत. तर दुधाचे दर वाढविण्याऐवजी कमीच केले आहेत. तोट्यातील दूध धंद्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात फक्त जनावरांचे शेणच राहते, अशी परिस्थिती झाली आहे. पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे नुकसान भरपाईचा पत्ता नाही. बड्या मंडळींची कर्जमाफ झाल्यानंतर गोरगरिबांनी दागदागिने गहाण ठेवून प्रामाणिकपणे कर्ज फेडले. त्यांना जाहीर केलेली मदत शासन देण्यास तयार नाही. गोरगरीब व शेतकरी यांनी करायचे तरी काय ? अशी अनेक गाऱ्हाणी त्या महिला शेतकऱ्यांनी समरजित घाटगे यांच्या समोर मांडली.

सरकारला जागे करण्यासाठी मी जिल्हाभर तुम्हा शेतकऱ्यांना भेटतोय, तुमचे प्रश्न जाणून घेतोय -

यावेळी त्यांना दिलासा देताना समरजित घाटगे म्हणाले, शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा दिलेला शब्द राज्य सरकार पाळत नाही. म्हणूनच या सरकारला जागे करण्यासाठी मी जिल्हाभर तुम्हा शेतकऱ्यांना भेटत आहे. तुमच्या प्रश्नात तुम्हा सर्वांना न्याय मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details