कोल्हापूर : जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि शिंदे गटाचे खासदार, आमदार यांची संयुक्त बैठक ( Bjp and shinde group ) आज कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये पार पडली आहे. यावेळी विविध महामंडळांवरील नियुक्ती, आगामी नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि आणि शहराच्या विकासाबाबत बैठकीत चर्चा करण्यात ( decision on many important topics ) आले आहे. जिल्ह्यात सध्या काँग्रेसच वर्चस्व असून त्याला सुरूंग कसा लावायचा याबाबत चर्चा ही झाल्या आहेत.
पालकमंत्री दीपक केसरकर नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यादरम्यान, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील यद्रावकर यांच्यासह मान्यवर या बैठकीला उपस्थित आहेत. जिल्हा नियोजन समिती मधील निधी आणि महामंडळावरच्या नियुक्ती हे विषय प्राधान्याने चर्चेत येतील अशी अपेक्षा आहे. डीपीडीसीच्या माध्यमातून यासाठी कार्यकर्त्यांना बळ देण्याचा निर्णय झाला असून दोन्ही पक्षांनी योग्य समनव्य साधण्याच्या दृष्टीने काही सूचनाही देण्यात आल्या आहेत.
डीपीडीसीच्या माध्यमातून सर्वांना समान निधी :शिंदे आणि फडणवीस सरकारचे मंत्री दीपक केसरकर आणि चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार खासदारांची बैठक घेत आगामी निवडणुकांची चाचपणी केली आहे. डीपीडीसीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना बळ देण्याचा निर्णय यामध्ये झाला असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे, तर शिंदे गटात आणि भाजप तसेच मित्र पक्षांनी एकमेकांशी योग्य समनव्य साधण्याच्या दृष्टीने काही सूचनाही देण्यात आल्या आहेत. सध्या दीपक केसरकर हे कोल्हापूरचे पालकमंत्री असल्याने जिल्हास्तरावर अनेक निर्णय पालकमंत्र्यांच्या हाती असतात. त्यामुळे भाजपच्या नेत्यांशी त्यांचा समन्वय ठेवणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने ही बैठक पार पडली असून सध्या शिवसेनेचे दोन्हीही खासदार शिंदे गटात आहेत. तर एक आमदार आणि अपक्ष म्हणून पाठिंबा दिलेले राजेंद्र पाटील हे सुद्धा शिंदे गटात आहेत. भाजपकडे केवळ राज्यसभेचा एक खासदार आहे. तर अपक्ष म्हणून पाठिंबा दिलेल्या विनय कोरे आणि प्रकाश आवाडे यांची साथ आहे. त्यामुळे जिल्ह्यात तसा शिंदे गट वरचढ ठरणारा आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात कोल्हापूरचा विकास कसा करायचा आणि डीपीडीसीच्या माध्यमातून सर्वांना समान निधी देण्यावर आणि विरोधी पक्षांना सोबत घेत काम करणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले आहे.
फॉर्मुलाच्या पलीकडे जाऊन आमचं काम :सध्या राज्यामध्ये शिंदे आणि भाजप चे सरकार असून ठरलेल्या फॉर्मुलाच्या पलीकडे जाऊन आम्ही काम करत असून दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड प्रमाणात समन्वय आहे. यामुळे येत्या काळात महानगरपालिका जिल्हा परिषद या निवडणुकांना सामोरे जातानाही आम्ही समन्वय ठेव आणि याचा परिणाम तुम्हाला दिसेलच शिंदे भाजप सरकार आल्यापासून अनेक चांगले निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस सह अन्य पक्षातील अनेक नेते कार्यकर्ते बाळासाहेबांची शिवसेना सोबत येण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र त्या सर्वांचा अभ्यास करूनच आम्ही त्यांना पक्षात घ्यायचे का नाही, हे ठरवू असेही केसरकर यावेळी म्हणाले आहेत.
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठक: अवकाळी व परतीच्या पावसाने जिल्ह्यातील 3 हजार 107 हेक्टर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या काढणीस आलेल्या भात, सोयाबीन, भुईमुग, नाचणी, ज्वारी अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या महिनाअखेर शासनाकडे अहवाल सादर करुन शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत करण्याचे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे. शिक्षणमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असता, त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात अवकाळी व परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, कोल्हापूर महानगरपालिकेचे उपायुक्त रविकांत आडसूळ, उपविभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी, जिल्हा नियेाजन विभागाचे श्री. इनामदार, कृषी पर्यवेक्षक संजय सुतार आदी उपस्थित होते.
महिनाअखेर शासनास अहवाल सादर करा :यावेळी केसरकर यांनी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत आढावा घेवून महिनाअखेर शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच कोल्हापूर शहरासह जिल्हाचा पर्यटन विकास, रंकाळा संवर्धन, राधानगरी पर्यटन विकास, लोकराजा शाहू महाराज वारसास्थळे आदी तसेच जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न व्हावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या आहेत. याच बरोबर जिल्ह्यातील शाळांची दुरूस्ती, पोलीस विभागाची वाहने व निवासस्थाने, जिल्हयात सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा सुस्थितीत ठेवण्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना पालकमंत्री केसरकर यांनी केल्या आहेत.
अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार :२० पटसंख्येच्या आतील कोणतीही शाळा बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला नाही. या केवळ अफवा आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांच्या तळाशी जाऊन त्यांच्यावर प्रसंगी कारवाई करू, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हा इशारा दिला आहे. दरम्यान, या निर्णयामुळे शिक्षकांच्या नोकऱ्या जातील, अशीही अफवा पसरली जात आहे. मात्र शिक्षकांना सर्विस ऍक्टनुसार प्रोटेक्शन असते. त्यामुळे अशी कोणतेही घटना घडणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.